सेवा बंद ठेवल्याबद्दल सोलापुरातील २८ रुग्णालयांना नोटिसा; सील ठोकण्याचा दिला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:11 AM2020-05-19T11:11:16+5:302020-05-19T11:13:31+5:30

सोलापूर महापालिकेच्या कारवाईवर डॉक्टरांनी घेतला आक्षेप; ऐकीव माहितीवर नोटीस बजावल्याचे म्हणणे

Notice to 28 hospitals for closure of services; Warning to seal | सेवा बंद ठेवल्याबद्दल सोलापुरातील २८ रुग्णालयांना नोटिसा; सील ठोकण्याचा दिला इशारा 

सेवा बंद ठेवल्याबद्दल सोलापुरातील २८ रुग्णालयांना नोटिसा; सील ठोकण्याचा दिला इशारा 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारकआपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणाºया डॉक्टरांवर कारवाई

सोलापूर : कोरोना आपत्तीच्या काळात आरोग्य सेवा बंद ठेवल्याचे सांगत शहरातील २८ रुग्णालयांच्या प्रमुखांना महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालय तत्काळ सुरू न केल्यास ते सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु, अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी या नोटिसीला हरकत घेतली आहे. आरोग्य विभागाने प्रत्यक्ष माहिती न घेता ऐकीव माहितीवर ही नोटीस बजावल्याचा आरोप केला आहे. 

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक रुग्णालये बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे. आपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणाºया डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. 

लोकांनी काही रुग्णालयांबाबत तक्रारी केल्या. यात २८ नर्सिंग होम, रुग्णालये बंद असल्याचे आढळून आले. यासंदर्भात दोन दिवसांत खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास रुग्णालय, नर्सिंग होम सील करण्यात येणार आहे. 

यांना बजावल्या नोटिसा..
- जाधवर नर्सिंग होम, भंडारी हॉस्पिटल, विजय क्लिनिक, स्पर्श निरो केअर हॉस्पिटल, सुरतकर नर्सिंग होम, लोणीकर हॉस्पिटल, बिराजदार हॉस्पिटल, झांबरे नर्सिंग होम, अंबिका हॉस्पिटल, मार्इंड इन्स्टिट्यूट न्यूरोफिजेटरी अँड डायटेशन अँड रिहॅबिटेशन सेंटर, एस. एस. बलदवा न्यूरो सायन्स अँड ह्युमन केअर हॉस्पिटल, सारडा हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल, जैन हॉस्पिटल, मांगल्य नर्सिंग होम, सुयश नर्सिंग होम, ओंकार नर्सिंग होम, लाईफ लाईन हॉस्पिटल, साठे नर्सिंग होम, शोभा नर्सिंग होम, कृष्णामाई नर्सिंग होम, संजीवनी नर्सिंग होम, व्यंकटेश हॉस्पिटल, सावस्कर हॉस्पिटल, दंतकाळे नर्सिंग होम, तुंबळ हॉस्पिटल, कार्वेकर हॉस्पिटल, कुमठेकर हॉस्पिटल.

नागरिकांच्या तक्रारीवरून नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालये सुरू असतील तर त्यांनी तारखेनुसार माहिती सादर करावी. ही नोटीस त्रास देण्याच्या उद्देशाने दिलेली नाही, लोकांनी केलेल्या तक्रारींमुळे दिली आहे. दवाखाने सुरू असतील तर काहीच अडचण नाही. 
-डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी, महापालिका. 

महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कोणतीही माहिती न घेता नोटीस बजावली आहे. आमचे हॉस्पिटल २४ तास सुरू आहे. सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारचे पीपीई किट, सुरक्षा यंत्रणा पुरवलेली नाही. आमचे काही कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात राहायला आहेत. त्यामुळे ते कामावर येऊ शकले नाहीत. उपलब्ध कर्मचाºयांच्या मदतीने काम सुरू आहे. या परिस्थितीत महापालिका आम्हाला अशी धमकीवजा नोटीस कशी काय देऊ शकते. ऐकीव माहितीवर बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यात आम्ही वेळ का घालवायचा.? आम्ही रुग्णालयात सेवा द्यायची की अशा नोटिसांना उत्तर द्यायचे. 
- डॉ. शिरीष कुमठेकर, कुमठेकर हॉस्पिटल, जुळे सोलापूर. 

Web Title: Notice to 28 hospitals for closure of services; Warning to seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.