संचारबंदीची गरज नाही; सोलापुरात टाळेबंदी नको.. जमावबंदी हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:22 PM2020-07-06T14:22:15+5:302020-07-06T14:24:51+5:30

उपासमार होईल; लॉकडाऊन, संचारबंदीपेक्षा अन्य पर्यायांचा विचार करावा; शहरात वावरण्यासाठीचे नियम कडक करावेत

No curfew required; No lockout in Solapur .. No curfew! | संचारबंदीची गरज नाही; सोलापुरात टाळेबंदी नको.. जमावबंदी हवी !

संचारबंदीची गरज नाही; सोलापुरात टाळेबंदी नको.. जमावबंदी हवी !

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झालेघरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झालेशहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली

रवींद्र देशमुख 

सोलापूर : कोरोना महामारीने शहरात कहर केला आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. या स्थितीत काळजी घेणे सर्वांचे कर्तव्य आहे; पण उपाययोजना म्हणून आता टाळेबंदीचा पर्याय सोडून द्यावा. त्याऐवजी कठोर जमावबंदी करावी, अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारच्या सोलापूर दौºयात संचारबंदी लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकर हवालदिल झाले आहेत. अनेकजणांनी शनिवारी संचारबंदीच्या भीतीने बाजारपेठांमध्ये गर्दी करून जीवनावश्यक वस्तही खरेदी केल्या.

लॉकडाऊनच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक - १ त्यानंतर अनलॉक -२ झाले. त्यामुळे व्यापार, व्यवसायाची गाडी रूळावर येऊ लागली. कष्टकºयांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सोलापूरकरांची सोयही झाली. लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झाले. घरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झाले. अनलॉक झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस विडी कारखाने सुरू झाले नाहीत; पण त्यानंतर तेही सुरळीत सुरू झाले. शहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली.

याशिवाय सलून आणि पार्लरचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना सुविधा मिळाली आणि तेथील चालक, कामगारांच्या हाताला काम मिळाले. आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले. तर शहरातील सर्वच व्यापार, व्यवसाय ठप्प होतील. लोक पुन्हा बेरोजगार होतील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा निर्णय घेताना सारासार विचार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासन जो काही निर्णय घेत आहे. तो शहरवासीयांना या महाभयानक रोगापासून दूर ठेवण्यासाठीच आहे; पण ही सोलापूरकरांचीही जबाबदारी आहे. त्यांनी नियमांचे पालन करून वावर करायला हवा. मास्कचा वापर करावा, डबलसीट दुचाकी प्रवास पाळावा, फिजिकल डिस्टन्स ठेवावे, असेही अनेकांनी सांगितले.

लॉकडाऊनची गरज नाही !
२३ मार्चपासून ३ जूनपर्यंत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात  शहरातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर परिणाम होऊन शहराचे अर्थचक्र पूर्णपणे बंद होते. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होईल, त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही, असे वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी केली. 

आमचा विरोध
गेली तीन महिने लॉकडाऊनमुळे हॉटेल, दुकानामध्ये काम करणारे कामगार बेकार झाले आहेत. संचारबंदीमुळे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करणार. संचारबंदी करून संसर्ग कमी होणार आहे काय? चाचण्या वाढविणे, अलगीकरण करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्याची गरज आहे.
- मनोहर सपाटे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

संचारबंदी परवडणारी नाही!
संचारबंदी आता परवडणारी नाही. सोलापूर कामगारांचे शहर आहे. आतापर्यंतच्या लॉकडाऊनमुळे जगण्याचा आधार हिसकावून घेतला गेला आहे. व्यापार थांबला आहे. वाजंत्री, पेंटर अशा छोट्या हातावर पोट असणाºयांचा संसार संकटात आहे. त्यामुळे अशात पुन्हा संचारबंदीला आमचा कडाडून विरोध आहे. जिथे रुग्ण आढळतात तेथे प्रतिबंध करावा.
- आनंद चंदनशिवे, प्रवक्ते, बहुजन वंचित आघाडी 

भविष्य अंधारात जाईल
संचारबंदी लागू केल्यास भाजीवाल्यांचे जेवणाचेही वांदे होतील. आमचे यातूनच उत्पन्न मिळत असते, ते जर बंद झाले तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. जर उत्पन्न बंद झाले तर मुलांचे भविष्य हे अंधारातच राहील.जर आता संचारबंदी लागू केली तर भाजीवाल्यांसह अनेक लघुउद्योजकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण होईल.
-अशोक राठोड, 
भाजी विक्रेते 

Web Title: No curfew required; No lockout in Solapur .. No curfew!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.