नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:03 PM2020-06-01T13:03:44+5:302020-06-01T13:05:40+5:30

अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा; पंढरपुरात पार पडले तीन विवाह सोहळे

The newlyweds feed the administration; He also helped the Covid Center | नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत

नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत

Next
ठळक मुद्देअजित पवार यांचा विवाह सायली गोवर्धन तर सुधीर पवार यांचा विवाह ऐश्वर्या दल्लू यांच्याशी झालाया विवाहाप्रसंगी वधू-वरांनी मास्क परिधान केला होता. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले होतेनिवडक पाहुण्यांच्या उपस्थित अक्षदा सोहळा पार पाडला

पंढरपूर : उंबरगाव (ता. पंढरपूर) व पंढरपुरातील उपनगर परिसरातील इसबावी येथे तीन विवाह सोहळे सोशल डिस्टन्सची बंधने पळून पार पडले. या विवाह सोहळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकाºयांनाच नवरा-नवरीनेच कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणाºया साहित्यांचा आहेर भेट दिला आहे.

उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील  अरुण नामदेव पवार यांचे चिरंजीव अजित पवार व सुधीर पवार यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थित करण्याचे आयोजन केले होते. अजित पवार यांचा विवाह सायली गोवर्धन तर सुधीर पवार यांचा विवाह ऐश्वर्या दल्लू यांच्याशी झाला आहे.
या विवाहाप्रसंगी वधू-वरांनी मास्क परिधान केला होता. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले होते. निवडक पाहुण्यांच्या उपस्थित अक्षदा सोहळा पार पाडला. यानंतर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. 

यानंतर दोन्ही वधु-वरांनी कोविड केअर सेंटरला उपयोगी पडेल, असे साहित्य गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्याकडे दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, ग्रामसेवक मुकरे, तलाठी व्यवहारे,  पोलीस पाटील सुरेश पवार, सरपंच विजय पवार, शहाजी पवार, नागनाथ चंदनशिवे, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

त्याचबरोबर पंढरपूर उपनगरातील इसबावी परिसरात अमोल मोहन चंदनशिवे व प्रियांका सागर गायकवाड यांचा मंगल परिणय झाला. यानिमित्त या वधू-वर रोख रक्कम पाच हजार रुपये पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे दिले. यावेळी कोवि ड वॉरियर्स विक्रम टिंगरे, सचिन  साबळे, दयानंद आटकळे, नगरसेवक प्रशांत मलपे, विनायक भांगे  उपस्थित होते.

सध्या कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड केअर सेंटर व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखणाºया लोकांना मदत करा असे आवाहन  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले आहे.

Web Title: The newlyweds feed the administration; He also helped the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.