जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:27 PM2021-10-09T20:27:23+5:302021-10-09T20:27:51+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग न्युज

Nearly two trucks collided head-on; A young man was killed and two others were seriously injured in the incident | जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

Next

मंगळवेढा : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर जत शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर फाट्याजवळ दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातमध्ये एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधून मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते.


 मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील सिध्देश्वर मधुकर इंगोले (वय-२२)  हे ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  तर दुसऱ्या ट्रक एम एच-१६:  9598 मधील महेंद्र थोरात (रा. जामखेड) आणि तुषार टेकाळे (रा. बीड) हे दोघेजण गंभीर जखमी आहेत.  त्यांना उपचारासाठी जत येथील रूग्णालयात दाखल केले आहे.   


घटनास्थळी उपस्थित असलेले सोहेल रसीद शेख, रा. बीड या ड्रायव्हरने अपघाताची माहिती दिली. 
शनिवारी दुपारी गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापूर फाटा येथे  दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही गाड्या लोड  होत्या. धडक होताच दोन्ही गाड्यांच्या केबिनचा अक्षरशः  चक्काचूर झाला. त्यामुळे सिध्देश्वर मधुकर इंगोले याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी आल्या.  पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. उशीराने जत पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Nearly two trucks collided head-on; A young man was killed and two others were seriously injured in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.