Muslims offered prayers for the rain for the brothers | मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली नमाज अदा
मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली नमाज अदा

ठळक मुद्देअल्लाहवर आमचा विश्वास असून, यंदा पाऊस चांगला पडेल, असा आशावाद मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी व्यक्त केलापाऊस पडला तर पाणी येईल, शेती चांगली पिकेल. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईलशेतीवर अवलंबून असणाºया मजुरांना काम मिळेल, देशात संपन्नता येईल. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळेल

सोलापूर : जून महिना संपत आला तरीसुद्धा पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. जिल्ह्यात दुष्काळ दाह वाढत आहे. यावर उपाय फक्त पावसाचाच आहे. यामुळे रंगभवन परिसरातील अहले हदिस ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी पावसासाठी सामूहिक नमाज अदा केली.

मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जगात पाप वाढले असून, माणसे अल्लाहपासून दूर जात आहेत. यामुळे पाऊस पडत नाही. अशा परिस्थितीत मोकळ्या मैदानावर अल्लाहकडे प्रार्थना करण्याची गरज होती. म्हणून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. अल्लाहकडे लोकांकडून होणाºया चुकांची माफी मागण्यात आली.

पावसाच्या स्वरुपात आमच्यावर उपकार कर. आमच्या चुकांना माफ कर. अशी याचना मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी केली.
देशभरात पावसाचे प्रमाण कमी आहे. यासाठी देशाच्या प्रत्येक शहरात पावसासाठी नमाज अदा करण्याचे आवाहन मौला ताहिर बेग अल मोहमदी यांनी केले. ते म्हणाले, सुन्नत जेव्हा जिवंत राहतील तेव्हाच देशाचा विकास होईल.

यासाठी मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या तत्वावर चालणे गरजेचे आहे. पाऊस पडला तर पाणी येईल, शेती चांगली पिकेल. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. शेतीवर अवलंबून असणाºया मजुरांना काम मिळेल, देशात संपन्नता येईल. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळेल.

अल्लाहवर आमचा विश्वास असून, यंदा पाऊस चांगला पडेल, असा आशावाद मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जनावरांकडे पाहून तरी पाऊस पाड..
- माणसे वाईट काम करतात म्हणून ते पापी आहेत. या सगळ्यात जनावरांचा काय दोष? म्हणून अल्लाहकडे दुवा मागताना मुस्लीम बांधवांनी घोडा आणला होता. या जनावराकडे पाहून अल्लाहने पाऊस पाडावा, अशी याचना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी दुवा (याचना) पुश्त (हात उलटा करुन) पद्धतीने केली. ज्याप्रमाणे उलटा हात सरळ करणे सोपे आहे, त्याच पद्धतीने अल्लाहला पाऊस पाडणे सोपे आहे, म्हणून अल्लाहकडे याचना केली.


Web Title: Muslims offered prayers for the rain for the brothers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.