प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटूचा खून; प्रेत दवाखान्यात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:46 PM2019-12-28T12:46:23+5:302019-12-28T12:48:55+5:30

सोलापुरातील घटना; अज्ञात मारेकºयांचा शोध पोलीसांकडून सुरू

The murder of a footballer in love; Phantom left in hospital | प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटूचा खून; प्रेत दवाखान्यात सोडले

प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटूचा खून; प्रेत दवाखान्यात सोडले

Next
ठळक मुद्देप्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होताहलाखीच्या परिस्थितीत त्याने  बी.ए़, बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले तो कुमार चौक येथे आपल्या आई व लहान भावासोबत राहत होता

सोलापूर : प्रेमप्रकरणावरून फॉरेस्टमधील कुमार चौकात राहणाºया एका पंचवीस वर्षीय फुटबॉल कोचला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दुपारी विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली़ प्रदीप विजय अलाट (वय २५, रा. रेल्वे लाईन, कुमार चौक, फॉरेस्ट) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप हा सकाळपासूनच घरातून बाहेर गेला होता़ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी आला आणि लगेच घरातून निघून गेला़ तो प्रेयसीसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरायला गेला होता़ तेव्हा आरोपींनी त्याला पाहिले आणि फोन करू न बोलावून घेतले़ प्रदीप त्यांना भेटायला गेल्यावर आरोपींनी त्याचा खून केला.

दरम्यान, तीन वाजण्याच्या सुमारास प्रदीपने आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला काही जण मारहाण करत आहेत, असे सांगून त्यांना लवकर येण्याची विनंती केली; पण मित्र पोहोचण्याच्या अगोदरच आरोपींनी प्रदीपला रिक्षामधून मोदी परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील स्ट्रेचरवर त्याला टाकून यांचे नातेवाईक येत आहेत, असे सांगून हॉस्पिटलच्या कर्मचाºयांना सांगून आरोपींनी तेथून रिक्षातूनच पळून गेले़ डॉक्टरांनी प्रदीपच्या खिशामधील मोबाईलने त्याच्या मित्रांना फोन करून प्रदीपबद्दल माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी ही माहिती प्रदीपच्या कुटुंबीयांना दिली.

 दरम्यान, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  कुटुंबीयांना माहिती कळाल्यानंतर लगेचच त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती़ त्यानंतर सायंकाळच्या सुमारास प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे़; मात्र जोपर्यंत आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी अशी भूमिका प्रदीपच्या नातेवाईकांनी घेतली आहे.  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते़ही घटना जेव्हा मोदी परिसरात कळाली तेव्हा तेथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता़ 
---------------
प्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होता़  हलाखीच्या परिस्थितीत त्याने  बी.ए़, बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले होते़ तो कुमार चौक येथे आपल्या आई व लहान भावासोबत राहत होता़ सोलापुरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे काम तो करत होता़ यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता़ कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.
--------------
हॉस्पिटलमधील कॅमेरे अस्पष्ट मारहाण करून प्रदीपला खासगी हॉस्पिटलमध्ये टाकून निघून गेले़ पण त्याला कोणत्या रिक्षामधून आणले होते? कोणी आणले होते? याची माहिती घेण्यासाठी जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले; तेव्हा त्यामध्ये अस्पष्ट चित्र दिसून आले़ 

Web Title: The murder of a footballer in love; Phantom left in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.