आधुनिक नवदुर्गा; पोलीस आहोत, आम्हाला अभिमान आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:25 PM2019-10-01T12:25:00+5:302019-10-01T12:25:06+5:30

कायद्याच्या माध्यमातून शक्य तेवढे समाजकार्य करतो

The modern novel; We are proud of the police! | आधुनिक नवदुर्गा; पोलीस आहोत, आम्हाला अभिमान आहे !

आधुनिक नवदुर्गा; पोलीस आहोत, आम्हाला अभिमान आहे !

Next

सोलापूर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य प्रमाण मानून आम्ही कायद्याच्या माध्यमातून शक्य होईल तेवढे समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला. होय...आम्हाला अभिमान आहे पोलीस खात्यात काम करत असल्याचा, असा अभिमान महिला पोलिसांनी व्यक्त केला. 

महिला म्हटलं की, चूल अन् मूल सांभाळत संसार सुखाचा करणे इतकंच तिचं आयुष्य असं समजलं जात होतं. चौकटीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा फायदा घेत, महिला पोलीस खात्यात पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. पोलीस हवालदार संगीता जगदीश चंद्रशेखर या सध्या जेलरोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. बार्शी येथे लग्नानंतर एक मुलगा, दोन मुली अशी अपत्ये झाली. पतीचे २00६ मध्ये निधन झाले. एका घरात त्यांनी धुणीभांडी करण्याचे काम पत्करले. काम करत करत त्यांनी १० व १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. १९९३ साली त्या सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात भरती झाल्या. 

पोलीस हवालदार पपितादेवी प्रभाकर पात्रे यांचे लहान वयात मिलिटरीतील जवानासोबत लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या एका वर्षात पती १९८७ साली राजीव गांधी पवन आॅपरेशनच्या युद्धावर श्रीलंका येथे गेले. तेथे त्यांना वीरमरण प्राप्त झाले. १९८७ साली पपितादेवी पात्रे यांनी दिल्ली येथे पतीच्या नावचे ‘वीरचक्र’ हे पदक स्वीकारले. दुसºया लग्नाचा विचार केला नाही. वीर जवानाची पत्नी म्हणून त्यांना १९९२ साली पोलीस खात्यात नोकरी मिळाली.  पोलीस नाईक रेश्मा सचिन मोरे या मूळच्या सोलापूरच्या़ बी़ए़चं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सीआरपीमध्ये नोकरी पत्करली. २00५ साली सातारा येथे लग्न झाले तेही लष्करातील जवानाशी. २00६ साली त्या सोलापुरात आल्या आणि शहर पोलीस दलात भरती झाल्या. पती लष्करात तर रेश्मा पोलीस दलात सेवा करीत होत्या. पती निवृत्त झाले असून, सध्या सोलापुरात आहेत. रेश्मा मोरे या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 

सात-आठ वर्षांची असताना वडील घरातून निघून गेले़ घरात आम्ही दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार होता. आई शिक्षक असली तरी तिच्यावर माहेरचीही जबाबदारी होती.  १९९३ साली पोलिसात भरती झाले आणि नंतर लग्न केले. भरती झाल्यानंतर लातूर येथे भूकंप झाला होता़ माझी ड्युटी तेथे लावण्यात आली होती़ नर्सबरोबर जखमींना औषधोपचार व इतर सेवा केली, अशी माहिती जेलरोडच्या पोलीस हवालदार जयश्री रामचंद्र सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: The modern novel; We are proud of the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.