टपरीमध्ये खेळला जाणारा मटका आता मोबाईलद्वारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:25 PM2019-09-16T15:25:52+5:302019-09-16T15:28:34+5:30

सोलापूर शहरात लाखोंची उलाढाल : पोलिसांसमोर आव्हान; कारवाई कोणावर करायची?

Matrika played in Tapri now via mobile! | टपरीमध्ये खेळला जाणारा मटका आता मोबाईलद्वारे !

टपरीमध्ये खेळला जाणारा मटका आता मोबाईलद्वारे !

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस खात्याला आव्हान देत मोबाईलवरून आॅनलाईन मटका जोरात सुरूदररोज लाखोंची उलाढाल होत असून, कोणावर अन् कशी कारवाई करायची हा सर्वात मोठा प्रश्न

संताजी शिंदे

सोलापूर : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसात शहरातील टपरीवर चालणारा मटका बंद झाला आहे; मात्र पोलीस खात्याला आव्हान देत मोबाईलवरून आॅनलाईन मटका जोरात सुरू आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असून, कोणावर अन् कशी कारवाई करायची हा सर्वात मोठा प्रश्न सध्या पोलीस खात्याला पडला आहे. 

सोलापुरात कल्याण, मुंबई हा मटका जोरात सुरू होता. शहरातील पान टपरी, चार चाकी हातगाड्यांवर मटका घेणारी मंडळी खुलेआम बोर्ड लावून बसलेली दिसत होती. शहरातील काही मंडळींनी आपली हद्द ठरवून घेऊन मटका घेत होती. आयुक्तांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांना दिले. अवैध धंद्यांमध्ये उघडपणे टपºयांमध्ये चालणारा मटका बंद झाला. हाच मटका आता टपरीतून मोबाईलमध्ये गेला आहे. मटका घेणारे एजंट हे घरात बसून किंवा अन्यत्र कोठेतरी थांबून व्यवसाय करीत आहेत. मटका खेळणारे खिलाडी बरोबर संबंधित व्यक्तीकडे जातात, आपला आकडा सांगतात अन् पैसे देतात.

मटका एजंट ही आपल्या नेहमीच्या ग्राहकाकडूनच मटक्याचा आकडा विचारतो अन् पैसे स्वीकारतो. पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला तरी संबंधित व्यक्तीकडे काही सापडत नाही. ओळखीचे ग्राहक  मोबाईलवरून संबंधितांना मटक्याचा आकडा सांगतो. मटका सुरू याची माहिती आहे, कोण चालवतो हे ही माहीत आहे; मात्र कारवाई कशी करणार.? कारण त्याच्याकडे पुरावे मिळत नाहीत असे पोलिसांकडून सांगितले जाते. 

मटका चालत असेल तर संपर्क साधा : डोंगरे
- शहरात मोबाईलवरून आॅनलाईन मटका घेणाºयांविरुद्ध कारवाई केली आहे. मटक्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटकही केली आहे, मात्र असा प्रकार जर कोठे सुरू असेल तर नागरिकांनी न घाबरता पोलीस आयुक्तालयातील 0२१७-२७४४६२00, १00 किंवा माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक ७५0७१३३१00 संपर्क साधावा. माहिती सांगणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपचा असाही फायदा...
- मटका घेतला जातो, तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित कंपनीला पोहोचवला जातो. मटका घेणाºया छोट्या एजंटाकडून संबंधित कंपनीचे लोक पैसे गोळा करतात. सध्या सुरत नाईट, अंधेरी नाईट, कल्याण या कंपनीचे मटके जोरात सुरू आहेत. वही, पेन अन् चिठ्ठीची जागा आता मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅपने घेतली आहे. 

ओपन क्लोजचा खेळ...
- मटका खेळण्याचे तीन प्रकार आहेत, त्यात एक आकडी सुट्टा खेळायचा असेल तर १ रुपयाला ९ रुपये. दोन आकडी जॉर्इंट मटका खेळायचा असेल तर ९ रुपयाला ९0 रुपये अन् तीन आकडी पान्हा खेळायचा असेल तर मात्र १ रुपयाला १२५ रुपये दिले जातात. सकाळी ९ ते दुपारी २.३0 पर्यंत एक बाजार चालतो. दुपारी ३ नंतर मटक्याचा आकडा जाहीर होतो याला ओपन म्हणतात. दुपारी ३ नंतर चालणारा बाजार ५.३0 पर्यंत चालतो सायंकाळी ६ नंतर आकडा जाहीर होतो, याला क्लोज म्हणतात. बहुतांश ग्राहक शक्यतो सुट्टा किंवा जॉर्इंट खेळण्यावर भर देतात. मुरब्बी व्यापारी मात्र ‘पान्हा’ खेळून आपले नशीब अजमावत असतात.   

Web Title: Matrika played in Tapri now via mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.