Married woman dies in a truck crash for Diwali | दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

ठळक मुद्दे- शहरातील गुरूनानक चौकातील घडली घटना- ट्रकची जोरात धडक बसल्याने विवाहित महिलेचा झाला मृत्यू- घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील अधिकाºयांनी दिली घटनास्थळाला भेट

सोलापूर : दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास गुरूनानक चौकात घडली. शुभांगी बनकर (वय ३० रा. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

मयत शुभांगी ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवर बसून घराकडे जात असताना गुरूनानक चौकात विजयपूरहुन हैद्राबादकडे जाणाºया  मालट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत विवाहित महिलेस जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालविणाºया वडिल गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती शहर पोलीसांनी दिली.

मयत विवाहित महिला ही पुणे येथील रहिवाशी असून दिवाळी सणासाठी आपल्या वडिलाकडे माहेरी आली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट दिली. 

Web Title: Married woman dies in a truck crash for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.