आबासाहेबांना अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे....आबासाहेब तुम अमर रहे...

By appasaheb.patil | Published: July 31, 2021 02:55 PM2021-07-31T14:55:36+5:302021-07-31T14:57:38+5:30

सांगोल्यात गणपतराव देशमुखांवर अंत्यसंस्कार; हजारो कार्यकर्ते हजर...

Last message to Abasaheb; Amar rahe ... amar rahe .... abasaheb tum amar rahe ... | आबासाहेबांना अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे....आबासाहेब तुम अमर रहे...

आबासाहेबांना अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे....आबासाहेब तुम अमर रहे...

Next

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं सोलापुरातील खासगी रूग्णालयात शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच  राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी सांगोला येथै आणण्यात आले. त्यानंतर अडीचच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत अमर रहे...अमर रहेच्या घोषणा देत आबांना अखेरचा निरोप देण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेतील सांगोल्याचे माजी आमदार शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ६:३० वाजता सोलापूर येथून मोहोळ मार्गे त्याच्या मूळ गावी सकाळी ८ वा. पेनूरला आणण्यात आलं. त्या ठिकाणी गावातील लोकांना दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव अर्धा तास अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.  तेथून पंढरपूरमार्गे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सांगोल्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून, सांगोला पंचायत समिती, कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा,  जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद समोरून, चौक नेहरू चौक, स्टेशन रोडने त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचेल.  तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. .तेथून महात्मा फुले चौक मिरज रोडने सांगोला येथील शेतकरी सूतगिरणीवर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी १ च्या दरम्यान भाई गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

----------------

चार किलोमीटरपर्यंतची रांगोळी

गणपतरावांना निरोप देण्यासाठी राज्यभरातील शेकापचे कार्यकर्ते व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी हजर होती. सांगाेलाकरांनी गणपतरावांच्या अंत्ययात्रा मार्गावर साधारण: चार किलोमीटरपर्यंत भावपूर्ण श्रध्दांजली अशा भावना लिहिलेली रांगोळी काढण्यात आली होती. अंत्ययात्रेत अमर रहे..अमर रहे...च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

Web Title: Last message to Abasaheb; Amar rahe ... amar rahe .... abasaheb tum amar rahe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.