सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:03+5:302021-07-27T04:24:03+5:30

सांगोला : दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन घेतलेल्या बाजारभावाप्रमाणे परत द्या म्हणत चौघांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण केले. ...

The kidnapping of Sarafa, who went for a morning walk in Sangola | सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण

सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण

Next

सांगोला : दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन घेतलेल्या बाजारभावाप्रमाणे परत द्या म्हणत चौघांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सराफाला एका खोलीमध्ये डांबून ठेवून मारहाण करून खिशातील मोबाईल काढून घेतला.

ही घटना सोमवारी पहाटे ५:३० च्या सुमारास सांगोला - वासैद रोडवर घडली.

दरम्यान, पोलिसांनी सतर्कता बाळगून अपहरणकर्त्याच्या तावडीतून सराफाची सुखरूप सुटका केली.

याबाबत, सराफ व्यावसायिक जितेंद्र महादेव जाधव रा. शिवाजीनगर, सांगोला यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी कल्याण शिवाजी बाबर, सोमनाथ कल्याण बाबर, अभिषेक कल्याण बाबर, संजय दिवसे (सर्वजण रा. आलेगाव, ता.सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जितेंद्र महादेव जाधव यांनी १० वर्षांपूर्वी आलेगाव येथील कल्याण बाबर यांच्याकडून २० गुंठे शेतजमीन १० हजार रुपये गुंठा याप्रमाणे घेतली होती. दरम्यान, गेल्या ७ महिन्यापूर्वी जितेंद्र जाधव हे या प्लॉटमधील दोन गुंठे जमीन विक्री करण्यासाठी नाना भालके (रा. केदार मळा) यांना प्लॉट दाखवण्यासाठी गेले होते. यावेळी कल्याण बाबर यांनी जितेंद्र जाधव व नाना भालके यांना शिवीगाळ करून गटात यायला विरोध केला. दहा दिवसापूर्वी कल्याण बाबर, सोमनाथ बाबर व अभिषेक बाबर हे जितेंद्र जाधव यांच्या दुकानात येऊन घेतलेल्या किमतीमध्ये जमीन विकत द्या म्हणत दम दिला होता. जितेंद्र जाधव हे सोमवारी पहाटे ५:३०च्या सुमारास नेहमीप्रमाणे वासूद रोडने मॉर्निंग वॉकला निघाले आणि अपहरण झाले. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, हवालदार आप्पासाहेब पवार यांनी त्यांचा पाठलाग केला आणि डांबून ठेवलेल्या घराचा दरवाजा उघडून सुखरूप सुटका केली.

Web Title: The kidnapping of Sarafa, who went for a morning walk in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.