सततच्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 08:55 PM2021-10-02T20:55:37+5:302021-10-02T20:56:52+5:30

शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

Kharif crops in Akkalkot taluka under water due to heavy rains; Ask Shiv Sena Chief Minister for help | सततच्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली

सततच्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली

googlenewsNext

सोलापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश मंडलातील खरीप पिके कुजुन गेली आहेत. यंदा खरीप पिक सततच्या पावसामुळे पुर्णपणे नष्ट झाली आहेत. सरसकट पंचनामा होण्यासाठी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर, कृषी मंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

अतिवृष्टीतील सरसकट पिकांचे पंचनामे व्हावेत, पिक विमा कंपनीने सामुदायिक आपत्ती अनुषंगाने ७२ तासात नुकसानीबाबत कंपनीला कळविणे बाबतची अट शिथिल करुन पिक पंचनामे करावेत, शेतकऱ्यानां खरीप पिक नुकसानीबाबत मदत द्यावी अशी मागणी अक्कलकोट तालुका शिवसेना उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी केली आहे.


अवकलकोट तालुक्यात यंदा मोठया प्रमाणात खरीप पेरणी झाली .बाजरी सुर्यफुल तुर सोयाबिन ;कांदा मका उडीद मुग आदी पिकांची वाढ यंदा समाधानकारक होती, यंदा ही पिके हाती लागतील असा मोठा आशावाद शेतकऱ्यानां वाटत होता, मात्र गेली पंधरा दिवस सतत पाऊस तालुक्यात होऊन हातातोंडाशी आलेले सोयाबीन सुर्यफुल, बाजरी, मका यासह खरीप पिक वारंवारच्या ,पाऊसान अक्षरक्षा : कुजली आहेत.  बाधीत खरीप पिकाचे पंचनामे व्हावेत विमा कंपनीन तुकसानी बाबत ७२ तासात कळविणेबाबत अट शितील करावी. नुकसानीबाबत पिक विमा कंपनीन पंचनामे करावित खरीप पिक नुकसानीबाबत शेतकऱ्याना मदत मिळावी अशी मागणी तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, उपप्रमुख सुर्यकांत कडबगाकर, सैपन पटेल,  शिवानंद कोळी, चौडपा गुजा, शहनाज पटेल, संतोष पाटील, राजशेखर गुरव, शरण सुरवसे, हणमंत नागुरे, राजु गोणापुरे बतगुणकी निखिल धुमाळ,  मलु कल्याणी,  नितीन मोरे,  यल्लपा मोरे, नागराज मरब, महादेव वडे, चंद्रकात कुंभार, भारत राजेगावकर, अनिल कोळी, समीर शेख,  प्रकाश कदम, बिरपा माळगे, किशन रजपुत, रफीक मुजावर, शिवानंद बिराजदार,  नागनाथ कापसे, संतोष पाटील, कमलेशवर लोहार, महिला तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, वैशाली हावनुर सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Kharif crops in Akkalkot taluka under water due to heavy rains; Ask Shiv Sena Chief Minister for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.