आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 07:16 PM2020-04-09T19:16:56+5:302020-04-09T19:20:12+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश; मास्क न वापरल्यास होणार कारवाई...

It is now mandatory to use masks in public places even in Solapur | आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक

आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोनाचा एक ही बाधित रुग्ण नाहीकोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाची टीम सज्जसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूरसोलापूर सार्वजनिक ठिकाणी कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तींना आता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दिली. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हि सक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्ते वाहन कार्यालय बाजार या ठिकाणी वावरताना तोंडाला कापडी मास्क रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकले जाईल असे साधन वापरणे गरजेचे आहे. मास्क हे मानांकित कंपनीने तयार केलेले किंवा घरगुती कापडापासून बनवलेले असेल तरी चालेल पण पुन्हा वापरताना ते स्वच्छ व निर्जंतुक करून वापरणे बंधनकारक राहील. कोणत्याही ठिकाणी एकत्र आलेल्या दोन व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर असणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, ताप लागणे अशी लक्षणे असलेल्या आजारी व्यक्तीने तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना करण्यासाठीचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. याबाबत आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे यांच्याकडून या नियमाचा भंग झाल्याचे निदर्शनास येईल त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता 1860 चे  कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाई पात्र ठरेल असा इशारा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला.

Web Title: It is now mandatory to use masks in public places even in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.