कारीत नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:56+5:302021-04-15T04:21:56+5:30

कारी : उस्मानाबाद जिल्ह्यात नुकताच समावेश झालेल्या कारीत सेवा सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे गावाच्या आरोग्याचा प्रश्न ...

The issue of civil health in Karit is on the rise | कारीत नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कारीत नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Next

कारी : उस्मानाबाद जिल्ह्यात नुकताच समावेश झालेल्या कारीत सेवा सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे गावाच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गावातील हनुमान मंदिर, खिंड चौक भागातील गटारी तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावात घाणीचे साम्राज्य आहे. डास व साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. वेशीतून गटारीचे पाणी वाहत आहे. परिणामी दुर्गंधी पसरून डासांची निर्मिती झाली आहे. गावात खिंड भागासोबतच अनेक ठिकाणी गटारी बुजलेल्या आहेत. गटारी तुंबण्याचा प्रश्न कचऱ्यामुळेच निर्माण होत आहे. गावातील कचरा हा प्रश्न गांभीर्याचा ठरला आहे. कचरा कुंडीची नितांत गरज असून तशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गादेकर यांनी मागील बैठकीत गटारी व स्वच्छतेबाबत विषय मांडला होता. परंतु महिना कालावधी लोटला तरी स्वच्छता होत नसल्याचे गादेकर यांनी सांगितले.

---

१६ एप्रिल रोजी उपोषणाची तयारी केली आहे. गावातील नागरी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात. या मागण्यांबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी केली असून तसे निवेदन त्यांना दिले आहे.

- अमोल जाधव

सामाजिक कार्यकर्ते

---

गटारीच्या दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य आणले असून लवकरच काम पूर्ण केले जाणार आहे.

- अनंत सोनटक्के

ग्रामसेवक, कारी

---

फोटो : १४ कारी

तुंबलेल्या गटारींमुळे कारी येथे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The issue of civil health in Karit is on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.