पोलिसांना पाहताच घाबरलेला इसम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:10+5:302021-05-17T04:21:10+5:30

दक्षिण सोलापूर : पोलिसांना पाहताच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याला दरदरून घाम आला, त्याची बोबडीच वळली. ही संधी साधत ...

Ism was frightened when he saw the police | पोलिसांना पाहताच घाबरलेला इसम

पोलिसांना पाहताच घाबरलेला इसम

Next

दक्षिण सोलापूर : पोलिसांना पाहताच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याला दरदरून घाम आला, त्याची बोबडीच वळली. ही संधी साधत पोलिसांनी दरडावले असता शिरूर येथील अपहरण प्रकरणातील संशयित गुन्हेगार पोलिसांच्या आपसूक हाती लागला.

शिरूर येथील शाहरुख शेख याला अक्कलकोटकडे जाताना वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी वळसंग टोल नाक्यावर थांबवले. त्याच्याकडे चौकशी केली असता बोलताना तो चाचपडला. त्याचे बोलणे काहीसे संशयास्पद वाटले आणि चेहऱ्यावरचे हावभाव तो सतत बदलत राहिला. हीच बाब भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टिपली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच खरे रूप बाहेर आले.

संशयित शाहरुख शेख फिटर असून, त्याने (इस्लामपूर जि पुणे) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते .ही अल्पवयीन मुलगीही त्याच्यासोबत होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आणि शिरूर पोलीस ठाण्याला कळवले. शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर भादंवि कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशिराने त्याचा ताबा शिरूर पोलिसांना देण्यात आला.

पुणे ग्रामीण चोरीच्या गुन्ह्यात शाहरुख शेख मोस्ट वॉन्टेड आहे.

या कारवाईत पोलीस शिपाई गणेश पाटील, चालक प्रमोद गायकवाड यांनीही सहभाग घेतला.

Web Title: Ism was frightened when he saw the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.