हवामान खात्याच्या इशाºयाकडे दुर्लक्ष; सोलापूर जिल्हा प्रशासनावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:13 PM2020-10-19T12:13:31+5:302020-10-19T12:13:34+5:30

राजू शेट्टी यांची मागणी; भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मिती, शेट्टींचे विधान

Ignoring the weather department's warning; Take action against Solapur district administration | हवामान खात्याच्या इशाºयाकडे दुर्लक्ष; सोलापूर जिल्हा प्रशासनावर कारवाई करा

हवामान खात्याच्या इशाºयाकडे दुर्लक्ष; सोलापूर जिल्हा प्रशासनावर कारवाई करा

Next

पंढरपूर : भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मित असून नागरिकांच्या घराच्या व शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाले आहे़ याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

भीमा नदीला पूर आल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी खा. राजू शेट्टीपंढरपूरला आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सचिन पाटील, तानाजी बागल, विजय रणदिवे, रणजित बागल, विष्णु बागल, प्रताप गायकवाड, साहेबराव नागणे, रायप्पा हळणवर उपस्थित होते.

पुढे राजू शेट्टी म्हणाले, हवामान खात्याने दिलेल्या ईशाºयाकडे जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. भीमा नदीला दुपारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते आणि रात्री अचानक लाखाचा विसर्ग सोडण्यात आला. नागरिक जीव जाण्याच्या भीतीने तत्काळ स्थलांतरित झाले. यामुळे जिल्हा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले़

Web Title: Ignoring the weather department's warning; Take action against Solapur district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.