'माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:13 PM2021-11-18T12:13:02+5:302021-11-18T12:13:46+5:30

संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखा आहे.

'I pay my salary to Sanjay Raut, he should run the house', ST Strike workers | 'माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं'

'माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं'

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय राऊत यांनी भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, असे बोलून आणखी आत्महत्या वाढवू नका. कामगार इकडं आत्महत्या करतोय, राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनाची बाळगावी, असे म्हणत या कामगाराने आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

सोलापूर/मुंबई - राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. सरकारने संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ST संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला. तर, कामगारांनी आहे या पगारात समाधान मानावं, असेही राऊत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन संपातील कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलंय. 

संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखा आहे. पगार मिळतो आहे त्यावर समाधानी राहावं’, असा सल्ला राऊत यांनी दिला. राऊत यांच्या या विधानावरुन संपातील कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. 'सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डूवाडी येथील बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही म्हणता हाय या पगारात करा, आम्ही तुम्हाला मागितलंच काय आहे. मी माझा 25 हजार रुपये पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी स्वत:चं घर चालवून दाखवावं, माझं दुसरं काहीही मागणं नाही, असे एका कर्मचाऱ्याने संतप्तपणे म्हटले. 

संजय राऊत यांनी भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, असे बोलून आणखी आत्महत्या वाढवू नका. कामगार इकडं आत्महत्या करतोय, राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनाची बाळगावी, असे म्हणत या कामगाराने आपला आक्रोश व्यक्त केला आहे. कुर्डूवाडी आगारातील 300 कर्मचारी संपात सक्रीयपणे सहभागी आहेत. 

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

शिवसेना सेठजी, बिल्डरचा पक्ष नाही. विरोधकांना लोकांची डोकी भडकवायची आहेत. एसटी कामगार संप जे चिघळवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. भाजप नेते एसटी आंदोलनात जात आहेत. जमलं तर त्यांना नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मारला. डोकी भडकावून भाजपला लाभ घ्यायचा आहे. पण यातून कामगार मरतोय, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना हा सेठजी, बिल्डरांना पक्ष नाही. हा कामगारांचा मोर्चा आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा ते त्यांचा संप चिघळवत आहेत अशी टीका त्यांनी केली.
 

Web Title: 'I pay my salary to Sanjay Raut, he should run the house', ST Strike workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.