पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:52 AM2021-11-24T10:52:14+5:302021-11-24T10:52:21+5:30

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, ...

I ate Diwali Faral till my stomach was full; Now the acidity problem has increased | पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

googlenewsNext

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, अबरचबर खाल्ले गेल्याने पोट खराब होण्याची शक्यता आणि अॅसिडिटीचा आजार वाढला आहे. मिठाई आणि पारंपरिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपरिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसानदेखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. अॅसिडिटी झाल्यामुळे छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. मात्र अतिजास्त प्रमाणात औषधांचा वापर केल्यास मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे.

---

अॅसिडिटी का होते

वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत.

---

तळलेले, मसालेदार पदार्थ टाळा

अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, शौचालयास त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध आणि नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉक्टर सिंह यांनी दिली आहे. तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.

---

रोज सकाळी लिंबूपाणी घ्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबूपाणी घेतल्याने शरीर साफ होते, लिंबूपाणी शरीरातील पाचकरसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबूपाण्याने हा त्रास दूर होतो, लिंबूपाण्यामुळे मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.

---

अॅसिडिटी होऊ नये म्हणून आपण जेवण आणि झोपण्याची वेळ पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तेलकट, तिखट आणि मसालेदार जेवण खाण्याऐवजी साधे जेवण केल्यास अॅसिडिटीपासून बचाव करू शकतो. वेळीच आजाराचे निदान करून तातडीने औषधोपचार करून घ्यावे.

- डॉ. मनोज कोरे, जनरल फिजिशियन

---

 

Web Title: I ate Diwali Faral till my stomach was full; Now the acidity problem has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.