धक्कादायक; वेडाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून; मानेवर घातली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:11 PM2020-11-30T13:11:28+5:302020-11-30T13:18:57+5:30

कुमठ्यातील घटनेनंतर पती अटकेत; सोलापूर शहर पोलिसांची घटना

Husband murders wife in madness; The ax on his neck | धक्कादायक; वेडाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून; मानेवर घातली कुऱ्हाड

धक्कादायक; वेडाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून; मानेवर घातली कुऱ्हाड

googlenewsNext
ठळक मुद्देशमशाद शेख ही घरामध्ये मिरची निवडत होती. मोठा मुलगा पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता दरम्यान, ही संधी साधून पती मेहबूबने घरातील कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या मानेवर वार केला

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे गावात वेडाच्या भरात पतीने मानेवर कुऱ्हाड घालून पत्नीचा खून केला. हा प्रकार रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. शमशाद शेख असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून, विजापूर नाका पोलिसांनी पती मेहबूब शेख (वय ५५) यास अटक केली आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता कुमठ्यात ही घटना घडली.

शमशाद शेख ही घरामध्ये मिरची निवडत होती. मोठा मुलगा पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. दरम्यान, ही संधी साधून पती मेहबूबने घरातील कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या मानेवर वार केला. काही वेळानंतर मुलगा पाणी घेऊन घरी आला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने आईला उचलून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याची माहिती विजापूर नाका पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पत्नीवर घेत होता संशय

मेहबूब शेख हा वेडसर होता, तो सतत बडबड करत होता. मला कोणीतरी मारायला येत आहे, असे म्हणत तो घरातच अधून-मधून लपून बसयचा. अधून-मधून तो पत्नीवर संशयही घ्यायचा.

खून करून बसला दारात

मेहबूब शेख हा पत्नीचा खून करून दारामध्ये येऊन बसला होता. खुनानंतर तो पळूनही गेला नाही. जणू काही घडलेच नाही, याच तोऱ्यात तो बसला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कसलाच तणाव नव्हता.

Web Title: Husband murders wife in madness; The ax on his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.