जमीन नांगरताना आढळले मानवी सांगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:16+5:302021-06-11T04:16:16+5:30

सदर सांगाडे, कवठी, हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी या भागात ...

Human skeletons found while plowing the land | जमीन नांगरताना आढळले मानवी सांगाडे

जमीन नांगरताना आढळले मानवी सांगाडे

googlenewsNext

सदर सांगाडे, कवठी, हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

तीस-चाळीस वर्षांपूर्वी या भागात राहणारे नागरिक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊसमळाअंतर्गत पडिक जागेत दफन करत असावेत. शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात राहायला होते. त्याकाळी पक्की स्मशानभूमी नसल्याने व सुमारे ५० वर्षांपूर्वी गोरगरीब, अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत. त्यातीलच हे सांगाडे असावेत. माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे-पाटील यांनी शेती महामंडळाकडून सुमारे २५० एकर जमीन संयुक्तिक करारांवर एकरी २५ हजार रुपये पुणे येथील हेड ऑफिसमध्ये पैसे भरून जमीन कसायला सुरुवात करण्यासाठी सदर जमीन नांगरत आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्त्यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली. मानवी सांगाडे आहे त्या जमिनीत व्यवस्थित दफन करा, यातील दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शेती महामंडळ श्रीपूर ऊसमळा येथील कर्मचारी भालचंद्र शिंदे, सुरक्षारक्षक विलास महाडिक यांनी तुमचे म्हणणे पुणे येथे हेड ऑफिसला कळवा, आम्हाला येथे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हेड ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे वंचित बहुजन आघाडीचे शैलेश शेंडगे, संदीप घाडगे, बंटी चंदनशिवे व इतर कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. या परिसरात राहणारे व पूर्वी शेती महामंडळ श्रीपूर ऊसमळ्यात काम करणाऱ्या रहिवाशांना राहण्यासाठी ८ एकर जमीनही द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

पुणे हेड ऑफिस येथून पुढील निर्णय येईपर्यंत या ८ एकर क्षेत्रावर ढवळे-पाटील यांनी ताबा घेऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी श्रीपूर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी धनाजी झगडे, गायकवाड बंदोबस्तास उपस्थित होते.

मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. कोणताही वाद, संघर्ष न होता पोलीस, कार्यकर्ते आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरण व्यवस्थित हाताळले. हेड ऑफिसमधून काय निर्णय व आदेश येतोय याकडे स्थानिक रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Human skeletons found while plowing the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.