ग्रामसेवकांचे सेवापुस्तक आता मोबाईलमध्ये पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:40+5:302021-01-17T04:20:40+5:30

बार्शी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवापुस्तके अद्ययावत करण्याच्या मोहिमेअंतर्गत बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचे मूळ सेवापुस्तक ...

Gramsevak's service book can now be viewed in mobile | ग्रामसेवकांचे सेवापुस्तक आता मोबाईलमध्ये पाहता येणार

ग्रामसेवकांचे सेवापुस्तक आता मोबाईलमध्ये पाहता येणार

Next

बार्शी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवापुस्तके अद्ययावत करण्याच्या मोहिमेअंतर्गत बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचे मूळ सेवापुस्तक अद्ययावत मोहीम बार्शी पंचायत समितीने अल्प कालावधीत राबवली. तालुक्यातील एकूण ९८ ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकाऱ्यांचे मूळ सेवापुस्तक अद्ययावत करून संबंधित ग्रामसेवकांना स्वतंत्र QR कोड व पासवर्ड देऊन POF स्वरूपात त्यांच्या मोबाईलवर पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. अशा प्रकारे काम केलेली बार्शी पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले व गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे सर्वांना मोबाईलव्दारे मूळ सेवापुस्तके पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. हा उपक्रम अल्प कालावधीत पूर्ण केल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कनिष्ठ सहा. ग्रामसेवक आस्थापना आनंद साठे व आर. सी. लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.

----पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठीही उपक्रम

जिल्हा परिषदेच्या डिजिटल उपक्रमांतर्गत हे काम पूर्ण करण्यासाठी आनंद साठे व आर सी लोखंडे, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष अंकुश काटे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, सचिव गोपाळ सुरवसे तसेच आर. यू. चौरे, संतोष माने, आर. एन. माळवे,डी. एल. जगताप व अन्य ग्रामसवेकांनी सहकार्य केले. आता केवळ ग्रामसेवकांचे सेवापुस्तक अद्ययावत केले आहे. लवकरच पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुस्तके अद्ययावत केली जातील, असे सभापती अनिल डिसले यांनी सांगितले.

-----

Web Title: Gramsevak's service book can now be viewed in mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.