Good News; फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आसलेल्या ई रिक्षात फिरणार विठ्ठल भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 08:41 AM2021-02-19T08:41:23+5:302021-02-19T08:41:54+5:30

निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशनकडून मंदीर समितीला भेट

Good News; Vitthal Bhakt will travel in an e-rickshaw with a gear box like a Ferrari car | Good News; फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आसलेल्या ई रिक्षात फिरणार विठ्ठल भक्त

Good News; फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आसलेल्या ई रिक्षात फिरणार विठ्ठल भक्त

Next

पंढरपूर : अपंग भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाण्यास त्रास होत होता. तश्या भाविकांची ये - जा करण्याची सोय व्हावी. या हेतूने १० लाख रुपये किंमतीच्या प्रदूषणमुक्त २ ई रिक्षा  मंदिर समितीला ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या भेट दिल्या आहेत. या ई रिक्षात फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आहे. अशा ई रिक्षात फिरणार विठ्ठल भक्त ये जा करणार आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. यामध्ये अधिक वयस्कर भविकांचा सहभाग बसतो. त्याचबरोबर अपंग व आजारामूळे चालता येत नसलेले भाविक देखील विठूरायाच्या दर्शनासाठी येतात. परंतु चौफाळा व महाद्वार चौकातून मंदिराकडे चार चाकी वाहन नेण्यास बंदी आहे. यामुळे अपंग व आजारामूळे चालता येत नसलेल्या भाविकांना मंदिराकडे जाताना खूप त्रास होत होता. अशा भाविकांची सोय करावी अशी मागणी वारकरी व भाविकांकडून होत होती. याची दखल घेत ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांनी संयुक्तरित्या खर्च करून मंदिर समितीला दोन ई रिक्षा भेट दिल्या आहेत. 

प्रदूषण मुक्त गाड्या...

फेरारी गाडीमध्ये जे गेअर बॉक्स असतात. त्या सारखा गेअर बॉक्स या ई-रिक्षामध्ये वापरण्यात आले आहेत. यामुळे गाडीतील बॅटऱ्या अधिक काळ टिकून राहतात. या गाडीसाठी इंधन लागणार नाही. गाडी चार्जिंगसाठी लाईटचा उपयोग होणार आहे. यामुळे या गाड्या प्रदूषण मुक्त आहेत. एका गाडीत ८ भाविकांना बसण्याची व्यवस्था आहेत. या गाड्या चौफाळा गेट ते मंदिर, महाद्वार पोलीस चौकी ते मंदिर या मार्गावरूनच ह्या ई-रिक्षा धावणार आहेत. याचा लोकार्पण सोहळा २१ फेब्रुवारीला होणार असल्याचे ॲड. माधवी निगडे यांनी सांगितले.

Web Title: Good News; Vitthal Bhakt will travel in an e-rickshaw with a gear box like a Ferrari car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.