Good News; एमपीएससी परीक्षेत करमाळ्याचा वैभव नवले राज्यात प्रथम

By Appasaheb.patil | Published: March 17, 2020 05:28 PM2020-03-17T17:28:23+5:302020-03-17T17:39:32+5:30

लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; साताºयाची दिपाली कोळेकर महिला गटात अव्वल

Good News; The first in the state is Naval in the MPSC exam | Good News; एमपीएससी परीक्षेत करमाळ्याचा वैभव नवले राज्यात प्रथम

Good News; एमपीएससी परीक्षेत करमाळ्याचा वैभव नवले राज्यात प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्दे- लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर- पीएसआय परीक्षेचा निकाल लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध- अहमदनगर येथील ज्ञानदेव काळे मागस प्रवर्गातून प्रथम

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) चा मंगळवारी दुपारी पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला़ या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात राहणारा वैभव नवले हा राज्यात प्रथम आला आहे. अहमदनगर येथील ज्ञानदेव काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. सातारा जिल्ह्यातील दिपाली कोळेकर ही महिला गटात राज्यात प्रथम आली.

वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरात राहतो़ त्याचे प्राथमिक शिक्षण करमाळा शाळा नंबर ३ येथे झाले़ पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले़ त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले़ २०१६ साली झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याला अपयश आले मात्र २०१८ साली घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत त्याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.



 

Web Title: Good News; The first in the state is Naval in the MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.