Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 02:31 PM2020-10-30T14:31:24+5:302020-10-30T14:31:30+5:30

अतिरिक्त भूसंपादनाकरिता मान्यता दिली : २९.९४ हेक्टरचे होईल भूसंपादन

Good News; 46 crore sanctioned for land acquisition of Boramani Airport | Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

googlenewsNext

सोलापूर : बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी ४६.२९ कोटी निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच अतिरिक्त २९.९४ हेक्?टरचे भूसंपादन होईल. यापूर्वी ५४९ हेक्टरचे भूसंपादन झालेले आहे. आता एकूण भूसंपादन ५८० हेक्?टर होईल. यापूर्वी ५७६ कोटी निधी मंजूर झाला आहे. एकूण भूसंपादन ५८० हेक्टर असून, याकरिता १२२ कोटी निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

बोरामणी व तांदूळवाडी या दोन गावांचा नकाशा एकत्र केल्याने अदर नकाशामध्ये काही गट नंबर आले नसल्याने ते संपादन करावयाचे राहिले. त्यामुळे सदर गट नंबर प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची येत असल्याने त्यातील सुमारे २९.९४ हेक्?टर क्षेत्र संपादित करणे आवश्यक झाले. त्यामुळे शासनाकडे अतिरिक्त भूसंपादनाकरिता अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. अतिरिक्त निधीकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावून अतिरिक्त निधीची मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात अजित पवार यांनी पन्नास कोटी निधी देणार असल्याचे जाहीर केले. सदर निधीकरिता आदेश निघणे क्रमप्राप्त होते. २९ सप्टेंबरला राज्य सरकारने जीआर काढून ४६ कोटी रुपये निधीला मान्यता दिली. त्यामुळे बोरामणी विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

डिसेंबर २००८ मध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली. त्यानंतर २०१० मध्ये भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पुन्हा २०१२ मध्ये भूसंपादनाच्या दुस?्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर आता आजपर्यंत अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित राहिला. येथील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाचाही प्रश्न आता मार्गी लागला आहे.

अतिरिक्त भूसंपादनाकरिता ४६ कोटी निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सदर निधी लवकरात लवकर मिळाल्यास भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करता येईल. भूसंपादन प्रक्रियेनंतर विमानतळाच्या दुस?्या टप्प्याकडे एक पाऊल टाकता येईल.
- सज्जन निचळ
व्यवस्थापक, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ

Web Title: Good News; 46 crore sanctioned for land acquisition of Boramani Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.