जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:41+5:302021-05-03T04:17:41+5:30

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस नाईक संदीप वाकीटोळ, पोलीस नाईक रामचंद्र जाधव, पोलीस नाईक अंकुशराव, असे सर्व जण मिळून ...

Gambling den raided, 12 charged | जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

Next

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस नाईक संदीप वाकीटोळ, पोलीस नाईक रामचंद्र जाधव, पोलीस नाईक अंकुशराव, असे सर्व जण मिळून सांगोला शहरातील वासूद चौक ते वासूद- अकोला, असे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना काही लोक माण नदीपुलाच्या खाली पत्त्याच्या डावावर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता संतोष खटकाळे, महादेव भालके, नीलेश कोळी, गणेश साळुंखे, मुकेश ऐवळे, वैभव पाटील, वैभव ऐवळे, समाधान ऐवळे, दत्ता ऐवळे, अमर शिंदे, दीपक गेजगे, अमोल सावंत सर्व जण रा. वासूद (आ), असे गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख २,२४० रुपयांसह जुगार साहित्य जप्त केले. याबाबत पोलीस नाईक महेश पवार यांनी वरील १२ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Gambling den raided, 12 charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.