Fourteen cows released for slaughter in Solapur | सोलापुरात कत्तलीसाठी जाणाºया चौदा गायींची सुटका
सोलापुरात कत्तलीसाठी जाणाºया चौदा गायींची सुटका

ठळक मुद्देयाप्रकरणी फौजदार चावडी व जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात संबंधित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल गोसेवा संघाच्या पदाधिकाºयांनी शेळगी पुलावर संबंधित गाडीचा पाठलाग करून  एमएच ४५ टी ४२१६ या क्रमांकाचा पिकअप टेम्पो अडविलागाडीमधील गायी सोलापूर-बार्शी महामार्गावरील अहिंसा गोशाळेला सुपूर्द करण्यात आल्या

सोलापूर : विनापरवाना अवैधरित्या गायींची वाहतूक करणाºया टेम्पोला पकडून कत्तलीसाठी जाणाºया १४ गायींची सुटका करण्यात गोसेवा संघाच्या पदाधिकाºयांना यश आले. सोमवार ५ आॅगस्ट व गुरुवार ८ आॅगस्ट रोजी ही कारवाई केली़ याप्रकरणी फौजदार चावडी व जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात संबंधित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दरम्यान, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या पदाधिकाºयांना खबºयामार्फत पुणे रोडवर कत्तलीसाठी जाणाºया गायी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गोसेवा संघाच्या पदाधिकाºयांनी शेळगी पुलावर संबंधित गाडीचा पाठलाग करून  एमएच ४५ टी ४२१६ या क्रमांकाचा पिकअप टेम्पो अडविला. या गाडीत दाटीवाटीने ११ गायी कोंबल्या होत्या.

 तत्काळ गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यास कळवून संबंधित पिकअप गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली़ या गाडीमधील गायी सोलापूर-बार्शी महामार्गावरील अहिंसा गोशाळेला सुपूर्द करण्यात आल्या. याशिवाय सोमवार ५ आॅगस्ट रोजी ३ गायींची सुटका केली़ याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बहिरवाडे यांनी दिली.

ही कारवाईप्रसंगी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष विजय यादव, गोरक्षक राजू बिचकुडे, यशवंत सुर्वे, अविनाश हजारे, प्रतीक्षित परदेशी, रणधीर स्वामी, संकेत आटकळे, प्रशांत परदेशी, गणेश सरवदे, ओंकार देशमुख यांनी केली़ याकामी फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे विश्वनाथ गायकवाड या अधिकाºयांचे सहकार्य लाभले.


Web Title: Fourteen cows released for slaughter in Solapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.