प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांना पितृशोक, पंडित गुलाम दस्तगीर यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:38 PM2021-04-22T16:38:25+5:302021-04-22T16:38:53+5:30

स्वतःच्या नातवाच्या विवाहाची लग्नपत्रिका त्यांनी मराठी, हिंदी व उर्दू भाषेत तयार केली होती. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेतील एकुण सहा पुस्तकांचा संस्कृत भाषेत अनुवाद केला आहे

Famous ghazal singer Badiujjama Birajdar passes away, Pandit Ghulam Dastagir passes away | प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांना पितृशोक, पंडित गुलाम दस्तगीर यांचं निधन 

प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांना पितृशोक, पंडित गुलाम दस्तगीर यांचं निधन 

googlenewsNext

सोलापूर - पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे आज रोजी दुपारी ३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे ते पिता होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. 

स्वतःच्या नातवाच्या विवाहाची लग्नपत्रिका त्यांनी मराठी, हिंदी व उर्दू भाषेत तयार केली होती. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेतील एकुण सहा पुस्तकांचा संस्कृत भाषेत अनुवाद केला आहे. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.
 

Web Title: Famous ghazal singer Badiujjama Birajdar passes away, Pandit Ghulam Dastagir passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.