European market dominated by pomegranate in Bhambuardi Shivar | भांबुर्डी शिवारातील डाळिंबाने गाजविली युरोपची बाजारपेठ
भांबुर्डी शिवारातील डाळिंबाने गाजविली युरोपची बाजारपेठ

ठळक मुद्देमाळशिरस तालुका अतिवृष्टीने बाधित होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले डाळिंब पिकाचे उत्पादन घेऊन आपल्या शेतातील डाळिंब थेट युरोपच्या बाजारपेठेत पाठविलेभांबुर्डी येथील डाळिंब बागायतदारांनी उच्च प्रतीचे व युरोप बाजारपेठेसाठी आवश्यक त्या पद्धतीचे डाळिंब जोपासले

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : माळशिरस तालुका अतिवृष्टीने बाधित होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात फळबागाही सुटल्या नाहीत़ मात्र भांबुर्डी येथील तीन शेतकºयांनी मुरमाड जमिनीवर प्रतिकूल परिस्थिती असतानाही डाळिंब पिकाचे उत्पादन घेऊन आपल्या शेतातील डाळिंब थेट युरोपच्या बाजारपेठेत पाठविले.  इतकेच नव्हे तर दरही चांगला मिळाल्याने त्याचाच बोलबाला झाल्याचे शेतकरी तानाजी वाघमोडे यांनी सांगितले.

एकीकडे कृषी क्षेत्राला विविध समस्यांना तोंड देऊन मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असतानाच भांबुर्डी येथील डाळिंब बागायतदारांनी उच्च प्रतीचे व युरोप बाजारपेठेसाठी आवश्यक त्या पद्धतीचे डाळिंब जोपासले आहे़ त्यामुळे त्या डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळाला आहे.

उसाचे आगार मानल्या जाणाºया तालुक्यात ऊस साखर कारखानदारी धोक्यात आली़ त्यामुळे उसाच्या शेतीकडे शेतकरी कानाडोळा करताना दिसत आहेत. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी आता डाळिंब लागवड करू लागले आहेत़ सध्या डाळिंबाचे बाजारभाव कमी-अधिक होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे अनेक डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र भांबुर्डी येथील शेतकरी तानाजी वाघमोडे, चांगदेव वाघमोडे व बबन वाघमोडे या शेतकºयांनी आपल्या शेतातील डाळिंब फळबागेला जूनमध्ये बहार धरला होता. या बहरात फळांचे सेटिंग चांगले झाले. मात्र पुढे पाऊस रेंगाळल्यामुळे या बागेवर विशेष लक्ष ठेवून औषध फवारण्या केल्या. पुढे ऊन वाढताच डाळिंब फळाला आच्छादन करून संरक्षण केले.

डाळिंबाचा बहार धरल्यापासून खते, औषधे व पाणी व्यवस्थापन या गोष्टींबरोबरच सेंद्रिय खतांचा अधिक वापर याकडे विशेष लक्ष दिले होते़ यामुळे डाळिंबाचा आकार, योग्य वजन व रंग या गोष्टी आकर्षक असल्यामुळे आमच्या डाळिंबाला युरोप बाजारपेठेसाठी निवड केली़ सध्या डाळिंबाचे बाजारभाव ढासळलेले असतानाही चांगला बाजारभाव मिळाला.
तानाजी वाघमोडे, डाळिंब उत्पादक, भांबुर्डी

Web Title: European market dominated by pomegranate in Bhambuardi Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.