विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; मार्चनंतर सोलापुरातून धावणार विजेवरील रेल्वे 

By appasaheb.patil | Published: September 18, 2020 11:59 AM2020-09-18T11:59:46+5:302020-09-18T12:01:42+5:30

मध्य रेल्वे : १०८ किमीचे काम पूर्ण, उर्वरित काम सहा महिन्यांत होणार

Electrification work in final stage; Electric train to run from Solapur after March | विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; मार्चनंतर सोलापुरातून धावणार विजेवरील रेल्वे 

विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; मार्चनंतर सोलापुरातून धावणार विजेवरील रेल्वे 

Next
ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात २०१२ साली सुरू करण्यात आलेले  दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेवाडी ते सावळगी या ५० किलोमीटर व दौंड ते वाशिंबे या ५९ किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेदौंड ते वाशिंबे या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली

सोलापूर : लॉकडाऊनमधील प्रवासी गाड्या बंदचा फायदा घेत रेल विकास निगम कंपनीने हाती घेतलेले मध्य रेल्वे विभागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत आहे़ ३४० किलोमीटरपैकी १०९ किमी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित २३१ किमीचे काम प्रगतिपथावर असून, तेही मार्च २०२१ अखेर पूर्ण होणार आहे़ मार्चनंतर सोलापूर विभागातून विजेवरील रेल्वे गाड्या धावण्यास सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.


मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात २०१२ साली सुरू करण्यात आलेले  दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ याशिवाय दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचे काम सुरू झाले़ सद्यस्थितीला दौंड ते सोलापूर व सोलापूर ते वाडीपर्यंत दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, वाडी ते सावळगी या ५० किलोमीटर व दौंड ते वाशिंबे या ५९ किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले़ त्यामुळे दौंड ते वाशिंबे या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली़ आता वाडी ते सावळगी व सावळगी ते दुधनीपर्यंतच्या झालेल्या कामावरील चाचणी येत्या काही दिवसात होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. 

गाड्यांची संख्या अन् वेग वाढणार
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वेमार्ग पूर्वी एकेरी होता, त्यानंतर दुहेरीकरणाची मागणी झाली. २०१२ साली दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली़ नऊ वर्षांनंतर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आहे़ संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर सोलापूर विभागातून धावणाºया सर्वच गाड्या या विजेवर धावणार आहेत़ त्यामुळे नक्कीच या गाड्यांचा वेग वाढणार असून, गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली़ 

दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण करण्यासाठी संबंधित रेल विकास निगम कंपनीला सूचना दिल्या आहेत़ आता ठरल्याप्रमाणे मार्च २०२१ अखेर हे काम पूर्ण होणार आहे़ काम पूर्ण झाल्यानंतर चाचण्या यशस्वी झाल्यानंतर निश्चित विजेवरील रेल्वे धावेल़ विद्युतीकरणाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत़
- शैलेश गुप्ता, 
विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग़

स्थानक़...                   या मुदतीत होणार काम पूर्ण

  • वाडी ते सावळगी (५० किमी) -         काम पूर्ण
  • सावळगी ते दुधनी (३६ किमी) -         नोव्हेंबर २०२०
  • दुधनी ते सोलापूर (६४ किमी) -        मार्च २०२१
  • दौंड ते वाशिंबे (५९ किमी) -        काम पूर्ण
  • वाशिंबे ते कुर्डूवाडी (५३ किमी) -        आॅक्टोबर २०२०
  • कुर्डूवाडी ते सोलापूर (७८ किमी)-     मार्च २०२१

Web Title: Electrification work in final stage; Electric train to run from Solapur after March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.