पावसाचा परिणाम; पहिल्या दोन तासात फक्त ३.५७ टक्के मतदान

By appasaheb.patil | Published: October 21, 2019 10:08 AM2019-10-21T10:08:10+5:302019-10-21T10:21:09+5:30

सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू

The effect of rainfall; Only 5.5 percent voted in the first two hours | पावसाचा परिणाम; पहिल्या दोन तासात फक्त ३.५७ टक्के मतदान

पावसाचा परिणाम; पहिल्या दोन तासात फक्त ३.५७ टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात विधानसभा मतदानाला सुरूवात- पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदान अत्यल्प- शहरातील अनेक मतदान केंद्रात पाणीच पाणी

सोलापूर : रविवारी मध्यरात्रीपासून पडणाºया पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले़ सोमवारी जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली़ मात्र पावसामुळे पहिल्या दोन तासात फक्त ३़ ५७ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक कार्यालयाने दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ५२१ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली़ मात्र जोरदार पावसामुळे सकाळी सात वाजल्यापासून नऊ  वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता़ शहरातील काही मतदान केंद्रात पाणी शिरले आहे तर काही मतदान केंद्रांबाहेर पाणीच पाणी झाल्याची चित्र पहावयास मिळत आहे.

Web Title: The effect of rainfall; Only 5.5 percent voted in the first two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.