शेतकऱ्यांना आर्थिक फटका;  डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

By Appasaheb.patil | Published: January 28, 2021 12:06 PM2021-01-28T12:06:51+5:302021-01-28T12:07:04+5:30

करी मशागतीच्या खर्चात २०० ते १००० रुपयांपर्यंतची वाढ

Economic blow to farmers; Tractor cultivation also became more expensive due to increase in diesel prices | शेतकऱ्यांना आर्थिक फटका;  डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

शेतकऱ्यांना आर्थिक फटका;  डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

googlenewsNext

सोलापूर - दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागात जसे नागरिकांना इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणले आहे, तसे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही वाढली आहे. साधारणपणे २०० ते १ हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याने एकरी मशागतीच्या खर्चाने हैराण झालेल्या डिझेल दरवाढीमुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे.

दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागात जसे नागरिकांना इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणले आहे, तसे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर यांचा वापर वाढला आहे. डिझेलची किंमत आता पेट्रोलच्या जवळपास येऊन ठेपली आहे. दोन्हीमध्ये थोडेच अंतर राहिले आहे. एकूणच पेट्रोलच्या पाठोपाठ डिझेलच्या किमती वाढल्याने याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांना सोसावे लागत आहे. अगोदरच कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता पेट्रोल-डिझलच्या महागाईला तोंड द्यावे लागत आहे.

दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढतच चालले आहे. त्यामुळे शेतीच्या अंतरमशागतीचे भावही आम्हाला नाईलाजाने वाढवावे लागत आहे. डिझेलचे भाव कमी झाल्यास आम्ही अंतरमशागतीचे भावही कमी करू.

- अमोगसिध्द म्हेत्रे, ट्रॅक्टर चालक, कोरवली

मी दरवर्षी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करतो, त्यात निघालेल्या उत्पनाला भाव मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी उत्पनाच्या अर्धे पैसे शेती मशागतीतीच खर्च होतात. डिझेलचे भाव कमी झाल्यास शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने शेती करणे परवडेल. अन्यथा शेती करणेच परवडणार नाही.

- आबा सुतार, शेतकरी

दुष्काळ, अतिवृष्टी नंतर कोरोनामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. शेतीकामात मजूर मिळत नसल्याने ८० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून शेतीची कामे करीत आहेत. त्यात डिझेलचा दर वाढल्याने मशागतचेही दर वाढले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

- गोविंद सुरवसे, शेतकरी...

-------------

मशागतीचे दर पुढीलप्रमाणे

  • नांगरणी -८०० - १०००
  • रोटा - १२०० - १५००
  • पेरणी - १००० - ११००
  • पालाकुटी - १२००-१५००

Web Title: Economic blow to farmers; Tractor cultivation also became more expensive due to increase in diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.