वेळेत उपचार अन् देखभालीमुळे जखमी घारीने घेतली आकाशात झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 02:21 PM2020-09-05T14:21:14+5:302020-09-05T14:23:16+5:30

पक्षीमित्र, नॅचरल ब्लू कोब्रा सर्पमित्र संघटना अन् नेचर कॉन्झर्वेशन सर्कलची तत्परता

Due to timely treatment and care, the injured Ghari took to the skies | वेळेत उपचार अन् देखभालीमुळे जखमी घारीने घेतली आकाशात झेप

वेळेत उपचार अन् देखभालीमुळे जखमी घारीने घेतली आकाशात झेप

Next
ठळक मुद्देकौतम चौकातून कन्ना चौकाकडे जाणाºया मार्गावर जखमी अवस्थेत घर पडल्याचे आढळून आलेया घटनेची माहिती मिळताच या परिसरात राहणारे हाजी सत्तार होटगीकर यांनी संबंधित अग्निशामक दलाच्या पथकास कळविले

सोलापूर : कन्ना चौकात जखमी अवस्थेत पडलेल्या घारीवर वेळेत उपचार करून त्याची योग्य देखभाल घेतल्यामुळे दोन दिवसानंतर त्या घारीने पुन्हा आकाशात झेप घेतली.

कौतम चौकातून कन्ना चौकाकडे जाणाºया मार्गावर जखमी अवस्थेत घर पडल्याचे आढळून आले़ या घटनेची माहिती मिळताच या परिसरात राहणारे हाजी सत्तार होटगीकर यांनी संबंधित अग्निशामक दलाच्या पथकास कळविले़ त्यानंतर या घटनेची माहिती पक्षीमित्र मुकुंद शेटे यांना समजताच तात्काळ त्यांनी नॅचरल ब्लू कोब्रा सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष अनिल आलदार यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्यांच्या मथोमध पडलेल्या घारीला पकडून अनिल आलदर यांनी देखभालीसाठी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य अजय हिरेमठ यांच्याकडे सोपविली़ हिरेमठ यांनी योग्य तो वैद्यकीय उपचार करून दोन दिवस त्याची काळजी घेतली, योग्य खाद्य दिले़ त्यानंतर ती घार चांगली ठणठणीत होताच त्या घारीला त्याच अधिवासात सोडून दिले़ निसर्गात मुक्त करताच त्या घारीने गगनभरारी घेतली.

Web Title: Due to timely treatment and care, the injured Ghari took to the skies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.