पीक पध्दतीत बदल केल्याने दोन एकरात घेतले तीन लाखांचे खरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:51 PM2020-02-29T12:51:32+5:302020-02-29T12:54:42+5:30

फुलचिंचोलीतील फळं पुण्याच्या बाजारपेठेत; फुलचिंचोलीतील नकुल बनसोडे यांची यशोगाथा

Due to changes in crop method, three lakh melons were taken in two acre | पीक पध्दतीत बदल केल्याने दोन एकरात घेतले तीन लाखांचे खरबूज

पीक पध्दतीत बदल केल्याने दोन एकरात घेतले तीन लाखांचे खरबूज

Next
ठळक मुद्देतोट्यातील शेतीतून कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणाºया खरबुजाची लागवड  नकुल बनसोडे असे त्या अवलियाचे नाव आहे पंढरपूर तालुक्यात फुलचिंचोली येथे त्यांची साडेपाच एकर जमीनकमी दिवसात व कमी पाण्यावर येणाºया खरबुजाकडे ते वळाले़ धनाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या फळपिकाला सुरुवात

अंबादास वायदंडे 
सुस्ते : पारंपरिक पिकाला कंटाळून पीक पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला़..तोट्यातील शेतीतून कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणाºया खरबुजाची लागवड केली...५० दिवसात खताची योग्य मात्रा दिली. वेळेत कीटकनाशकं फवारली. रासायनिक खताबरोबर शेणखत अन् बेसन मिक्स क रून ट्रॅक्टरने रोटरुन घेतले..क़मी पाण्यात ५० दिवसात ६५० कॅरेट उत्पादन निघाले आणि तीन लाखांचे उत्पन्न काढले आहे़ यातून आणखी १२०० कॅरेट उत्पादन निघणार असून सर्व फळं ही पुण्याच्या बाजारपेठेत विकली जात आहेत़ ही किमया साधली आहे फुलचिंचोलीतील एका शेतकºयाने.

 नकुल बनसोडे असे त्या अवलियाचे नाव आहे पंढरपूर तालुक्यात फुलचिंचोली येथे त्यांची साडेपाच एकर जमीन आहे. अनेक वर्षांपासून उसाचे पीक घेत होते़ या पिकाला जास्त कालावधी व जास्त पाणी लागते. खूप मेहनत घेऊनही योग्य दर मिळत नसल्याने बनसोडे नाराज झाले़ पीकपद्धत बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला़ कमी दिवसात व कमी पाण्यावर येणाºया खरबुजाकडे ते वळाले़ धनाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या फळपिकाला सुरुवात केली़ दोन एकरात मशागत करून त्यामध्ये चार ट्रेलर शेणखत वापरले़ त्यानंतर रासायनिक खत, शेणखत व बेसन मिक्स होण्यासाठी ट्रॅक्टर रोटरून त्यावर मल्चिंग पेपर अंथरला़ मोहोळ तालुक्यातून पासले येथून दोन रुपये दराने १७ हजार रोपं आणली.

 १८ डिसेंबर रोजी अडीच फुटावर ३ कुंदन वाणाच्या खरबुजाची रोपं लावली़ रोपाच्या बुडात पंपाद्वारे खताची मात्रा दिली़ तसेच एक दिवसाआड वीस मिनिट ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. खरबुजाच्या वेलावर आळी व नाग आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकाची फवारणी केली. करपा, कुजवा, डावगी व भुरी हे आजार पसरु नयेत म्हणून बुरशीनाशकांची फवारणी केली. ठिबकच्या माध्यमातूून ११़४२़११ हे विद्राव्य खत दिले. तसेच खरबुजाची फुगवण व्हावी म्हणून काही रासायनिक खते ठिबकमधून दिली. तसेच खरबूज तडकू नये म्हणून कॅल्शियम एक्साइडची फळावर फवारणी केली.

अशाप्रकारे नकुल बनसोडे  यांच्या प्रयत्नाला वडील मधुकर बनसोडे, आई राजाबाई बनसोडे, पत्नी साधना बनसोडे, भाऊ  नानासाहेब बनसोडे, भावजय संध्याराणी बनसोडे, मित्र दादाश्री गायकवाड, तानाजी मोहोळकर यांची साथ लाभली. 

५० दिवसांत पहिली तोड 
- व्यवस्थापन केल्यानंतर ४० ते ५० दिवसाने पहिल्या तोडीत १०० कॅरेट खरबूज निघाले़ दुसरी तोड २७५ कॅरेट तर तिसरी तोड ३५० कॅरेट  निघाला़ आत्तापर्यंत ६२५ कॅरेट खरबूज निघाले़ एका कॅरेटमध्ये १९ किलो खरबुजाचे वजन ठरले. एक किलो खरबुजापोटी २८ ते ३० रुपये दर मिळाला़ आतापर्यंत ११ टन खरबूज निघाले़ ३  लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे़ आणखी १२०० कॅरेट अर्थात २१ टन खरबूज निघणे अपेक्षित आहे. यापासून चार ते साडेचार लाख रुपये आणखी मिळणार आहेत. 

उसाला कारखान्याकडून योग्य दर मिळत नाही़ याला कंटाळून दोन वर्षांपूर्वी धनाजी मोहोळकर यांच्या खरबुजाची शेती पाहिली आणि तोच प्रयोग केला़ विष्णू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खरबुजाची लागवड केली़ लागवडीनंतर ७० दिवसांत साडेसात लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

- नकुल बनसोडे, खरबूज उत्पादक,  फुलचिंचोली (ता. पंढरपूर)

Web Title: Due to changes in crop method, three lakh melons were taken in two acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.