दक्षिणमधील गावागावात फिरू लागला ड्रोन कॅमेरा; जाणून घ्या काय आहे नेमके कारण

By Appasaheb.patil | Published: March 26, 2021 01:04 PM2021-03-26T13:04:47+5:302021-03-26T13:05:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Drone cameras roaming the villages in the south; Find out exactly why | दक्षिणमधील गावागावात फिरू लागला ड्रोन कॅमेरा; जाणून घ्या काय आहे नेमके कारण

दक्षिणमधील गावागावात फिरू लागला ड्रोन कॅमेरा; जाणून घ्या काय आहे नेमके कारण

googlenewsNext

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील 58 गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने आज सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत असल्याने उपअधिक्षक भूमि अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले

येळेगांव येथे आज सीमांकन करण्यात आले. मंगळवारी ड्रोनव्दारे मोजणीस सुरवात केली जाणार आहे. 31 एप्रिल अखेर तालुक्यातील 58 गावांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जरग यांनी सांगितले. गावठाण भूमापन योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन चुना पावडरच्या सहाय्याने वेळेवर करुन घ्यावे. सार्वजनिक मिळकती  आणि रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास, भुमी अभिलेख अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, योग्य माहिती पुरवावी, असे आवाहनही  जरग यांनी केले आहे. 

मोजणी करण्यात येणारी गावे...

अकोले मंद्रुप, अंत्रोळी, आलेगांव आहेरवाडी, औज आहेरवाडी, इंगळगी, खानापूर, उळेवाडी, गावडेवाडी, कर्देहळ्ळी, कणबस, कुडल, तेलगांव मंद्रुप, गुंजेगाव, चंद्रहाळ, चिंचपूर, लिंबीचिंचोळी, तिर्थ, तिल्लेहाळ, तोगराळी, दर्गनहळ्ळी, दिंडुर, दोड्डी, नांदणी, बंकलगी, बंदलगी, बरूर, बाळगी,  बिरनाळ, बोळकवठे, बोरूळ, मनगोळी, कुरघोट, मंद्रे, यत्नाळ, येळेगांव, राजूर, रामपूर, लवंगी, वरळेगांव, वडापूर, वडगांव, वडकबाळ, वडजी, वांगी, सिंदखेड, शिर्पनहळ्ळी, शिरवळ, संगदरी, संजवाड, सादेपूर, सावतखेड, हत्तरसंग, हिपळे, बक्षीहिप्परगे, होनमुर्गी, औज मंद्रुप, कारकल, कसूर.

Web Title: Drone cameras roaming the villages in the south; Find out exactly why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.