केंद्राने घेतला निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार महिनाकाठी फक्त पन्नास पोती खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 07:15 PM2021-01-22T19:15:30+5:302021-01-22T19:15:35+5:30

शेतकºयाला महिनाकाठी फक्त ५0 पोती खत घेण्यावर निर्बंध

Decision taken by the Center; Now farmers will get only fifty bags of fertilizer per month | केंद्राने घेतला निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार महिनाकाठी फक्त पन्नास पोती खत

केंद्राने घेतला निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार महिनाकाठी फक्त पन्नास पोती खत

Next

सोलापूर: केंद्र शासनाच्या सबसिडीवरील रासायनिक खते आता शेतकºयांना महिनाकाठी फक्त ५0 पोतीच घेता येणार आहेत. खते विक्रीबाबत केंद्र शासनाने नवे निर्बंध लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.

शेतकºयांना अत्यंत गरजेचे असलेले युरिया, डीएपी या रासायनिक खतांवर केंद्र सरकार सबसिडी देते. त्यामुळे या खतांच्या किमती कमी आहेत. बागायती शेतकºयांना सतत रासायनिक खतांची गरज भासते तर कोरडवाहू शेतकरी खरीप व रब्बीच्यावेळीच ही खते खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करताना दिसून येतो. पण तरीही पाच एकर शेती असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही खते खरेदी करताना दिसून आले आहेत. त्यामुळे गरजू शेतकºयांनाच सबसिडी असणाºया खतांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनाने खरेदीवर पहिल्यांदाच निर्बंध लागू केले आहेत.

केंद्र सरकारच्या रसायन व फर्टीलायझर मंत्रालयाचे संचालक निरंजन लाल यांनी याबाबत गुरूवारी आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये एका शेतकºयाला एका महिन्यात खतांच्या फक्त ५0 पोती खरेदी देता येतील. ज्यांचे प्लॉन्टेशन आहे त्यांच्यासाठी ही मर्यादा २00 पोती असेल. खते खरेदीवर अशी पहिल्यांदाच मर्यादा घालण्यात आली आहे.

शेतकºयांची अडचण नाही

या नव्या निर्बंधामुळे शेतकºयांची अडचण होणार नाही असे चित्र आहे. कोणतेही शेतकरी महिन्यात ५0 पोती खताचा वापर करीत नाहीत. मोठे बागायतदार की ज्यांच्याकडे उस मोठ्या प्रमाणावर आहे अशा शेतकºयांना मात्र खताचा डोस टप्प्या टप्याने द्यावा लागणार आहे.

Web Title: Decision taken by the Center; Now farmers will get only fifty bags of fertilizer per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.