Breaking; सोलापूर शहराबरोबरच या तालुक्यातही लागू होणार संचारबंदी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:35 PM2020-07-11T16:35:36+5:302020-07-11T16:43:18+5:30

अधिकाºयांच्या बैठकीत होतोय प्लॅन तयार; अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

A curfew will be imposed in this taluka along with Solapur city | Breaking; सोलापूर शहराबरोबरच या तालुक्यातही लागू होणार संचारबंदी...!

Breaking; सोलापूर शहराबरोबरच या तालुक्यातही लागू होणार संचारबंदी...!

Next
ठळक मुद्देसंचारबंदीकाळात सोलापुरात रेशन दुकाने पाच दिवस, दूध, वर्तमानपत्र वितरण, मेडिकल दुकाने सुरूच राहतीलसोलापूर शहर व संबंधित तालुक्यात ज्या गावांमध्ये संसर्ग आहे, त्या ठिकाणी चाचण्या करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर दिला जाणारसध्या या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आणखी इतर अधिकाºयांची मते जाणून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार

सोलापूर : सोलापूर शहरासह कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात असलेल्या पाच तालुक्यातही संचारबंदी लागू करण्याचा अधिकाºयांचा प्रस्ताव आहे. 
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित अधिकाºयांची शनिवारी दुपारी जिल्हा नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त पी़ शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग असलेल्या ठिकाणी संचारबंदी लागू करून रॅपीड किटद्वारे चाचणी घेण्याच्या प्रस्तावावर अधिकाºयांशी चर्चा केली. त्यावर सोलापूर शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर या तालुक्यामधील गावामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या गावातही संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

संचारबंदीकाळात सोलापुरात रेशन दुकाने पाच दिवस, दूध, वर्तमानपत्र वितरण, मेडिकल दुकाने सुरूच राहतील, मात्र शहराबाहेरून दूध घेऊन येणाºयास प्रतिबंध राहणार आहे. सोलापूर शहर व संबंधित तालुक्यात ज्या गावांमध्ये संसर्ग आहे, त्या ठिकाणी चाचण्या करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर दिला जाणार आहे, अशा पद्धतीने प्राथमिक स्तरावर असा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. इतके नियोजन करून ही बैठक संपवण्यात आली व शनिवारी सायंकाळी पुन्हा याच विषयावर वरील अधिकाºयांची बैठक होणार आहे. सध्या या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आणखी इतर अधिकाºयांची मते जाणून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: A curfew will be imposed in this taluka along with Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.