आषाढीच्या पार्श्वभूमीवर १७ ते  २५ जुलै दरम्यान पंढरपूरसह आसपासच्या ९ गावात संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:03 PM2021-07-05T13:03:51+5:302021-07-05T13:04:13+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Curfew in 9 surrounding villages including Pandharpur from 17th to 25th July on the backdrop of Ashadi | आषाढीच्या पार्श्वभूमीवर १७ ते  २५ जुलै दरम्यान पंढरपूरसह आसपासच्या ९ गावात संचारबंदी

आषाढीच्या पार्श्वभूमीवर १७ ते  २५ जुलै दरम्यान पंढरपूरसह आसपासच्या ९ गावात संचारबंदी

googlenewsNext

सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या ९ गावात १७ ते २५ जुलै २०२१ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आषाढी एकादशी मंगळवार दि.२० जुलै २०२१ वा श्री. विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते पहाटे २.२० ते ३.३० पर्यंत होणार आहे. दरम्यान, आषाढी वारीस दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात शनिवार १७  जुलै २०२१ रोजी दुपारी २.०० वाजल्यापासून रविवार २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पंढरपूर शहर व आजूबाजूच्या लगतच्या ९ (भटूंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी इत्यादी ) गावात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Curfew in 9 surrounding villages including Pandharpur from 17th to 25th July on the backdrop of Ashadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.