अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:52 AM2020-09-22T10:52:35+5:302020-09-22T10:52:43+5:30

१५ हजार शेतकरी बाधीत: बार्शी, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर, माळशिरसचा समावेश

Crops on 11,000 hectares in Solapur district damaged due to heavy rains and floods | अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

googlenewsNext

सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने  व माण आणि भीमेला पूर येऊन १५ हजार ३0२ शेतकºयांच्या ११ हजार २१ हेक्टरावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

 
जिल्ह्यात दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी सहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने तलाव, नाले भरून वाहिले आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पीके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच जोडीला उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर व दक्षिण सोलापूर तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

नदीकाठची शेती मोठया प्रमाणावर वाहून गेली आहे. भीमेची पातळी अचानक वाढल्याने शेतातील वस्तीवर असणारी जनावरे, ट्रॅक्टर, पंप, पाईपलाईनबरोबरच डाळींब, केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसात कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याची प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. नुकसानीची माहिती अजूनही घेतली जात असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकारी माने यांनी स्पष्ट केले.  


१७२ गावांना बसला फटका

पाच तालुक्यातील १७२ गावांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. यामध्ये माळशिरसमध्ये ९, दक्षिण सोलापूर तालुक्यात २५, सांगोल्यात ११, मंगळवेढ्यात १७, पंढरपूरमध्ये ६३ तर बार्शीत ४७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरावर खरिपाच्या कांद्याची लागवड झाली होती. यातील ८१५ शेतकºयांच्या ४९0 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 


विमा कंपन्याचे सर्वेक्षण सुरू

अति पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. अद्यापही बºयाच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. बºयाच शेतांमध्ये तळी असल्याने पीकांपर्यंत पोहोचता येत नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात बांध, नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे शेतांना पाणी लागले आहे. यामुळे या शेतात रब्बीचा पेरा करणेही अवघड होणार आहे. 

असे झाले तालुकानिहाय नुकसान...


माळशिरस, बाजरी: ७२१ शेतकरी (हेक्टर:५८६), मका:२0७ (१३४), उस: ६३ (३९), डाळींब: ५३ (२६), द्राक्ष: ४९ (२५), एकूण: १0९३ (८१0).
दक्षिण सोलापूर, तूर: १८७५ शेतकरी, ( हेक्टर: १३५९), मूग: १६९ (९0), उडिद: ६१0 (३८८), मका: ५४२ (३0७), सोयाबीन: ४४ (४२.८0), भुईमूग: ४५५ (२६९), बाजर: ७७ (४१), सूर्यफुल: २ (३), भाजीपाला: १४५ (८0), कांदा: ६६५ (३९१), पेरू: २(१), एकूण: ४५८६ (२९७१.८0).
सांगोला, ढोबळी मिरची: २४ (१४), द्राक्ष: ४३ (२२), बाजरी: ९३ (६९), मका: १0५ (७३), डाळींब: ८३ (५४), एकूण: २४३ (१५९).
मंगळवेढा, सूर्यफुल: ३१२ (२00), बाजरी: ५७ (४0), कांदा: ४३ (२५), इतर भाजीपाला: ११७ (८५),एकूण: ५२९ (३५0).
पंढरपूर,उस: २४३५ (१८९९), डाळींब: १६५५ (११५३), द्राक्ष: १५९२ (१२१0), भाजीपाला: ५४७ (३११), चारापीके: ५00 (२९५), मका: ५१२ (३0९), एकूण: ७२४१ (५१७७). 
बार्शी, उडिद:२४ (१८), सोयाबीन: १४७९ (१४६२), कांदा: १0७ (७४)

Web Title: Crops on 11,000 hectares in Solapur district damaged due to heavy rains and floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.