जातिवाचक शिवीगाळप्रकरणी कुर्डूवाडीतील तिघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:01+5:302021-06-23T04:16:01+5:30

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात शिराळ येथील रामचंद्र बुवा जगताप यांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी कुर्डू (ता. माढा) येथील ...

Crime against three in Kurduwadi in racist abuse case | जातिवाचक शिवीगाळप्रकरणी कुर्डूवाडीतील तिघांविरोधात गुन्हा

जातिवाचक शिवीगाळप्रकरणी कुर्डूवाडीतील तिघांविरोधात गुन्हा

Next

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात शिराळ येथील रामचंद्र बुवा जगताप यांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी कुर्डू (ता. माढा) येथील तिघांवर कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रामचंद्र बुवा जगताप (रा. शिराळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, शिराळ येथील रामचंद्र जगताप कुर्डू येथील त्यांच्या बहिणीला भेटायला गेले होते. सायंकाळी बहिणीस भेटून कुर्डूवाडीकडे जात असताना मारुती मंदिराजवळ संशयित आरोपी आकाश रोहिदास धोत्रे, अमोल रोहिदास धोत्रे, संदीप रोहिदास धोत्रे (रा. कुर्डू, ता. माढा) यांनी जगताप यांना अडवून त्यांच्याच मोटारसायकलवरून जबरदस्तीने घरी घेऊन गेले. तेथे जातिवाचक शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी पाईपने दोन्ही बरगड्यांवर मारून जखमी केले. त्याचप्रमाणे डोक्याच्या मागील बाजूस चाकूने मारहाण केली. तसेच लाथा घालून मोबाईल फोडला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे करीत आहेत.

Web Title: Crime against three in Kurduwadi in racist abuse case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.