गौडगाव येथे मुलासह दाम्पत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:31+5:302021-04-19T04:20:31+5:30

वैराग : विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मुलासह दाम्पत्याला मारहाण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात गौडगाव येथे घडला. ...

Couple beaten with child at Gaudgaon | गौडगाव येथे मुलासह दाम्पत्याला मारहाण

गौडगाव येथे मुलासह दाम्पत्याला मारहाण

Next

वैराग : विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मुलासह दाम्पत्याला मारहाण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात गौडगाव येथे घडला. या प्रकरणी वैराग पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नागनाथ लाटे (रा. गौडगाव, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोमवार नागनाथ लाटे हे शेतातून घरी आले होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर हिराचंद शिंदे हा मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होता. यावेळी लाटे यांनी कोणास व का शिवीगाळ करतो, असा जाब विचारला. तेव्हा हिराचंद शिंदे, नामदेव शिंदे, यशवंत शिंदे, बापूसाहेब शिंदे (सर्व रा. गौडगाव) यांनी लाटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लाटे यांच्या पत्नी व मुलगा हे सोडवण्यास आले असता त्यांनाही बेदम मारहाण केली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे हे करीत आहेत.

Web Title: Couple beaten with child at Gaudgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.