Corona Warriors honored by Swarajya Group in Tembhurni | टेंभुर्णीत स्वराज्य ग्रूपकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

टेंभुर्णीत स्वराज्य ग्रूपकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

यावेळी डॉ. अमोल माने, डॉ. विक्रांत रेळेकर,डॉ. प्रणिती खोटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हिलाले, आरोग्य सेवक त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी, आशा वर्कर, बँकेचे अधिकारी, सपोनि सुशील भोसले व त्यांचे सहकाऱ्यांना प्रमाणपत्र, शाल, मास्क, पुष्प देऊन सन्मानित केेले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,रावसाहेब देशमुख, प्रमोद कुटे, डॉ.अमोल माने, सपोनि सुशील भोसले, गणेश केचे, बिभीषण देशमुख, सोमनाथ कदम यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संयोजक प्रशांत देशमुख, शिवजन्मोत्सव मंडळाचे रणजित अटकळे, संदीप अटकळे, गौरव देशमुख, अमित पाटील, स्वप्नील शेळके, हर्षल काशवेद, अमित देशमुख, रत्नदीप अटकळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपसरपंच धनंजय गोंदील,शैलेश ओहोळ, अमोल धोत्रे, डॉ. सोमनाथ साळुंके मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन राजेंद्र मुळे,राजू पाटील यांनी केले.

Web Title: Corona Warriors honored by Swarajya Group in Tembhurni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.