पंढरपुरात पुन्हा ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:22 PM2020-07-04T21:22:56+5:302020-07-04T21:24:28+5:30

१२४ जणांचे अहवाल प्रलंबित; सात जणांची साखळी शोधण्याचे काम सुरु 

Corona report of 7 people in Pandharpur again positive | पंढरपुरात पुन्हा ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह

पंढरपुरात पुन्हा ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह

Next

पंढरपूर : पंढरपुरातील कोरोना संशयित ६४ व्यक्तींचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला होता. त्यामध्ये ५७ निगेटिव्ह तर ७ जण पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. परंतु आणखी १२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे रविवारी आणखी कितीजण पॉझीटिव्ह निघणार याकडे पंढरपुरकरांचे लक्ष लागले आहे. 


पंढरपुर शहरातील कोरोना संशयित ७३८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ६१४ जणांना कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. तर १२४ जणांचा कोरोना अहवाल प्रलंबित आहे. ५८५ जणांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तर ३० जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यापैकी ८ जण उपचारा दरम्यान बरे झाले आहेत. तर २२ जणांवर उपचार सुरु आहेत.

मुंबई, सांगोला, मंगळवेढा व मोहोळ पॉझिटिव्ह आलेले ५ तर पंढरपूर शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेले २५ असे एकूण ३० रुग्णांना आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील ८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. शनिवारी ६४ जणांचा अहवाल प्राप्त झाला होत. त्यामध्ये ५७ निगेटिव्ह तर ७ जण पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. पंढरपूर शहरातील जोशी अपार्टमेंट (लिंक रोड), येळेवस्ती, करकंब (ता. पंढरपूर), क्रांतीनगर करुल रोड (मोहोळ), वाकी शिवणे (ता. मंगळवेढा), भिले वस्ती शाळा पाटखळ (मंगळवेढा) या परिसरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील तिघे पंढरपूर शहरातील, करकंब (ता. पंढरपूर) येथील उल्हानगर वरुन आलेली व्यक्ती, मंगळवेढा येथील १, मोहोळ येथील पोलीस कर्मचारी परंतु सध्या पंढरपूर येथे आहे. तसेच १ जण वाकी शिवणी (ता. पंढरपूर) येथील आहे.

शनिवारी कोरोना पॉझीटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे माहिती घेण्याचे काम सुरु आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे, विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊन, सुरक्षित अंतर ठेवून इतरांशी संपर्क करावा असे आवाहन प्रांत अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाल वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले  यांनी केले आहे. मंदिर समितीच्या खाजगी सुरक्षा रक्षकाचा समावेश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करणाºयाला कोरोनाची लागण झाली. तो सुरक्षा रक्षक एका अधिकाºयांच्या वाहनावरील चालकाच्या संपर्कात होता. त्याची माहिती मिळताच त्याला तत्काळ कॉरंटाईन करण्यात आले होते.

Web Title: Corona report of 7 people in Pandharpur again positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.