छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 03:16 PM2020-10-09T15:16:13+5:302020-10-09T15:19:08+5:30

मराठा समाज आक्रमक; सदावर्ते यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

Complaint lodged with Solapur Police against Ad Sadavarte for defaming Chhatrapati family | छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार

छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार

googlenewsNext

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्याबद्दल अपशब्द बोलणाºया अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजाचे देविदास भोजप्पा शेळके (दास शेळके) यांनी सोलापूर पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, अ‍ॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा़ संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपशब्द बोलून त्यांना अफझलखान संबोधून गंभीर आरोप केलेले आहे़ सदावर्ते यांच्या प्रक्षोभक विधाने केल्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये कलह निर्माण होऊन दंगली होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरूध्द दंगा घडवून आणण्यासाठी बेछुटपणे विथावनी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीची तक्रार सोलापूर शहर पोलिस दलातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दास शेळके यांनी केली आहे.

Web Title: Complaint lodged with Solapur Police against Ad Sadavarte for defaming Chhatrapati family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.