दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:32 PM2020-05-22T12:32:06+5:302020-05-22T12:34:13+5:30

पंढरपुरातील खाजगी चार रुग्णालय अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू

Comforting news; The patient suffering from ‘corona’ will now get treatment in Pandharpur | दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जनकल्याण रुग्णालयात सदरचा रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात येईलमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार

पंढरपूर : पंढरपुरातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार देण्यात येणार आहे. तसेच एका हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर करण्यात येणार आहे. या चारही खाजगी रूग्णालयाला अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी दिले.

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोविड १९ ची लक्षणे असणाºया रुग्णांना दाखल करणे अपेक्षित आहे़ याकरिता पंढरपूर शहरातील विठ्ठल हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात येणार आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून शहरातील अपेक्स हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल निश्चित करण्यात आलेले आहेत. या रुग्णालयांचे कोविड १९ उपचाराकरिता अधिग्रहण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.  यापैकी पहिले पहिल्या फेजमध्ये जनकल्याण हॉस्पिटल हे  डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून रुग्णालय व त्यांच्याकडे एकूण मनुष्यबळ, जीवरक्षक प्रणाली व उपलब्ध साधनसामग्री अधिग्रहित करण्यात आलेले आहे.

कोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जनकल्याण रुग्णालयात सदरचा रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात येईल. या रुग्णालयांमध्ये इतर विविध आजारांवर उपचार घेणाºया रुग्णांना त्या आजाराशी संबंधित महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कार्यरत असणाºया इतर रूग्णालयात संदर्भित करण्यात येईल.  तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी सांगितली.

Web Title: Comforting news; The patient suffering from ‘corona’ will now get treatment in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.