मोहिते-पाटील गटाच्या 'त्या' सदस्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:29 PM2020-01-13T18:29:20+5:302020-01-13T18:34:50+5:30

सभापतीपदी निवडीत भाग घेता येणार; पुढील सुनावनी मंगळवारी होणार

Comfort to those 'members' of Mohite-Patil group | मोहिते-पाटील गटाच्या 'त्या' सदस्यांना दिलासा

मोहिते-पाटील गटाच्या 'त्या' सदस्यांना दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे- जिल्हा परिषदेच्या त्या सदस्यांना तात्पुरता दिलासा- उद्या होणार जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची निवडी- काँग्रेसने तक्रारी अर्ज माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सोलापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीत पक्षाध्यक्ष डावलल्याप्रकरणी मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रार अर्जावर सोमवारी सुनावनी अपूर्ण राहिल्याने त्या सदस्यांना तुर्त दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मोहिते-पाटील गटाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावर माळशिरस तालुक्यातून निवडून आलेल्या शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरूण तोडकर व अन्य एका सदस्यांविरूध्द जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़ या तक्रारीवर सोमवारी सुनावनी झाली़ मोहिते-पाटील गटाच्या वकीलांनी पुरावे देण्यासाठी मुदत मागणीचा केलेला अर्ज व त्यावर मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासंदर्भात केलेला अर्ज जिल्हाधिकाºयांनी फेटाळला.

त्यानंतर दोन्ही बाजुचा युक्तीवाद सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालला़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी पुढील सुनावनी मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता घेण्याचे जाहीर केले़ त्यानंतर राष्ट्रवादीच्या त्या सदस्यांच्या चेहºयांवर हास्य फुलले़ कारण मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची निवड आहे़ या निवडणुकीत या सदस्यांना भाग घेता येणार आहे.

काँग्रेसने माघार घेतला अर्ज...
पक्षाध्यक्ष डावलल्याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी मल्लिकार्जुन पाटील, शिलवंती भासकी व शिवानंद पाटील या तिघांविरूध्द तक्रार दाखल केली होती. या अर्जावर सुनावनी होणार होती परंतू गायकवाड यांनी तक्रार अर्ज माघार घेतल्याचे अ‍ॅड़ उमेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Comfort to those 'members' of Mohite-Patil group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.