डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्रामीण भागात सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 02:47 PM2020-10-22T14:47:23+5:302020-10-22T14:47:29+5:30

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना; खासगी डॉक्टरांना रुग्णांचा अहवाल बंधनकारक

Colds, flu and flu pills will not be available in rural areas without a doctor's prescription | डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्रामीण भागात सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या मिळणार नाहीत

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्रामीण भागात सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या मिळणार नाहीत

Next

सोलापूर: ग्रामीण भागातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हाधिकाºयांनी जारी केलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे आता मेडिकल दुकानदारांना सर्दी, पडसे, फ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत असे बंधन घालण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अद्याप वाढलेलाच आहे. मृत्यूदरही कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे मंगळवारी तालुका वैद्यकीय अधिकाºयांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत कोरोना रुग्णांवर कशाप्रकारे उपचार सुरू आहेत व रुग्णांचा शोध कसा होत आहे याची माहिती घेण्यात आली. जुनाट आजार व ज्येष्ठ नागरिकांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात असलेल्या खासगी दवाखान्यात अनेकजण सर्दी, तापाचा त्रास झाल्यावर उपचारास जातात. याची माहिती आरोग्य विभागाला मिळत नाही. आता खासगी डॉक्टरांना दिवसभरात उपचारास आलेल्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करा. त्यांच्याकडून आलेल्या यादीनुसार त्या रुग्णाच्या घरी जाऊन अ‍ॅटिजेन टेस्ट करा अशा सूचना डॉ. जाधव यांनी दिल्या आहेत. यामुळे संशयित रुग्णांचा वेळेत शोध होऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. संपकार्तील लोक व संशयित रुग्णांचा शोध घेऊन चाचण्या वाढवा. मेडिकल दुकानदारांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नये अशा सूचना द्या. जे दुकानदार चिठ्ठीशिवाय औषध देतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिका?्यांना यावेळी देण्यात आल्या आहेत.

उपचारास होतोय विलंब
कोरोना संसगार्तून ज्येष्ठ व्यक्तींचा बळी जात आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींचा शोध झाल्याबरोबरच ग्रामीणस्तरावरच उपचाराची व्यवस्था करा. मोठ्या गावात अशी ओपीडी सुरू करण्याचे प्रस्ताव द्या असे आरोग्य अधिका?्यांना सांगितल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.

Web Title: Colds, flu and flu pills will not be available in rural areas without a doctor's prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.