कोंडी ग्रामस्थांना सीईओ स्वामींचे धडे; विनामास्क असलेल्या लोकांना सुनावले खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 03:24 PM2021-04-06T15:24:02+5:302021-04-06T15:24:49+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

CEO Swami's lessons to Kondi villagers; Ball stones to people without masks | कोंडी ग्रामस्थांना सीईओ स्वामींचे धडे; विनामास्क असलेल्या लोकांना सुनावले खडेबोल

कोंडी ग्रामस्थांना सीईओ स्वामींचे धडे; विनामास्क असलेल्या लोकांना सुनावले खडेबोल

Next

सोलापूर - वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी गावभेट दौऱ्यावर आहेत. सीईओ स्वामी यांनी आज कोंडी येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, गावचे सरपंच मंगल राठोड, उपसरपंच किसन भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापट, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर व ग्रामसेवक मारुती कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रथम संपूर्ण गावात फेरी मारून गावातील स्वच्छता, दुकानांची व्यवस्था, आदींची पाहणी केली. यावेळी विना मास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांना स्वामी यांनी खडे बोल सुनावले व मास्क घालण्या संदर्भात प्रबोधन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे भेट देऊन कोरोना लसीकरण सत्राची यावेळी पाहणी करून आवश्यकत्या सुचना केल्या. 

याचवेळी जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन ऑनलाइन शिक्षणा संदर्भात शिक्षकांशी संवाद साधला शाळेकडून राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम, शाळेतील बोलक्या भिंती यांचे सीईओ स्वामी यांनी कौतुक केले. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन कमी पगारात कोरोना सारख्या महामारीत अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी अति उत्कृष्ट काम केल्याचे गौरवोद्गार यावेळी परमेश्‍वर राऊत यांनी काढले

 

 

Web Title: CEO Swami's lessons to Kondi villagers; Ball stones to people without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.