Caught gutkha coming from Karnataka to Mars; Property worth Rs 8 lakh confiscated | कर्नाटकातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटखा पकडला; ८ लााखांचा मुद्देमाल जप्त

कर्नाटकातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटखा पकडला; ८ लााखांचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढा :  कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हदद्ीत येणारा गुटख्याचा टेंपो पोलिसांनी पकडून टेंपोसह 7 लाख 80 हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून  सुनिल भारत वायभसे (वय 30 रा. दापोली), निलेशकुमार बन्सीलाल बाहोती (वय 30 रा. नागरगाव ता. शिरूर, पुणे) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबतची माहिती अशी, कर्नाटक राज्यातून  एम एच 42, एक्यू 5569 या टेंपोमधून 13 हजार 552 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा, 49 हजार 920 रुपये किमतीचा विमल पान मसाला, 13728 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, 57 हजार 600 रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला, 24 हजार रुपये किमतीची एम सुगंधी तंबाखू, 1 लाख 21 हजार 968 रुपये किमतीचा विमल पान मसाला मोठा असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दि. 22 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा भरून त्याची अवैधरित्या वाहतूक  वरील आरोपी सोडडी गावच्या शिवारातून करीत असताना पोलिसांना मिळून आले.याची फिर्याद पोलिस शिपाई अभिजीत साळुंखे यांनी दिली आहे.


दरम्यान, लॉकडाऊन संपल्यानंतर कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात गुटखा मंगळवेढयात येत आहे.त्याचबरोबर बेकायदा शस्त्रे, अफू, गांजा याचीही तस्करी होत असल्याची चर्चा आहे.मंगळवेढयापासून केवळ 20 कि.मी. अंतरावर कर्नाटकची सीमा आहे. कर्नाटक राज्यात गुटखा खुला असल्याने  येथील व्यापारी तेथे जावून खरेदी करून चोरटया मार्गाने मंगळवेढयात प्रवेश करीत आहेत. ही सर्व तस्करी रोखण्यासाठी मंगळवेढा सीमेवर चेक आऊटपोस्ट गरजेचे आहे.नूतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कामी लक्ष घालून सीमेवर चोख बंदोबस्त नेमावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Web Title: Caught gutkha coming from Karnataka to Mars; Property worth Rs 8 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.