कार अन् दुचाकीचा अपघात; आजोबा व नात जागीच ठार, करमाळा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 10:20 PM2021-08-10T22:20:29+5:302021-08-10T22:20:47+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Car and two-wheeler accident; Grandfather and grandson killed on the spot, incident in Karmala taluka | कार अन् दुचाकीचा अपघात; आजोबा व नात जागीच ठार, करमाळा तालुक्यातील घटना

कार अन् दुचाकीचा अपघात; आजोबा व नात जागीच ठार, करमाळा तालुक्यातील घटना

Next

करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झरे फाटा परिसरात एका दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने मागून जोरदार धडक दिली. यात आजोबा व नात ठार झाली आहे.

सुट्टीमुळे नात झरे येथे आजोबांकडे आली होती, मात्र तिच्यावर व आजोबांवर काळाने घाला घातला. मृत्यू झालेल्यामध्ये नातीचे नाव संजवनी शंकर मिटे (वय १३) व आजोबा हरिभाऊ सोपान गायकवाड (वय ६५) असे आहे.

Web Title: Car and two-wheeler accident; Grandfather and grandson killed on the spot, incident in Karmala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.