The 'Bubble Show' max, childish tune | ‘बबल शो’ची कमाल, बालचमूंची धमाल
‘बबल शो’ची कमाल, बालचमूंची धमाल

ठळक मुद्देरोजच्या अभ्यास, धगधग, क्लासेस यामुळे पूर्ण दिवसाचं शेड्युलच पॅक विद्यार्थ्यांना काहीतरी मनोरंजन आणि कलांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ गेल्या १८ जूनला प्रारंभ झालेल्या नावनोंदणीला भरघोस प्रतिसाद मुलांनी दिला

सोलापूर : बालविकास मंचच्या नावनोंदणीस उत्तम प्रतिसाद देत उत्तम कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद बालचमूंनी घेतला. निमित्त होतं लोकमत बालविकास मंच आयोजित आणि लुक अ‍ॅण्ड लाईक यांच्या सौजन्याने रविवार दि. ११ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे आयोजित केलेल्या ‘बबल शो’चे़ याला उदंड असा प्रतिसाद सदस्यांनी दिला. 

रोजच्या अभ्यास, धगधग, क्लासेस यामुळे पूर्ण दिवसाचं शेड्युलच पॅक होतं, पण विद्यार्थ्यांना काहीतरी मनोरंजन आणि कलांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ हवे म्हणून लोकमतने बालविकास मंचची स्थापना केली. गेल्या १८ जूनला प्रारंभ झालेल्या नावनोंदणीला भरघोस प्रतिसाद मुलांनी दिला. नावनोंदणी शुल्क २०० रु. असून नावनोंदणी करताच सेलो कंपनीची वॉटर बॉटल, एशियनचा टिफिन, विविध कुपन्स, मस्ती की पाठशाला स्टोरी बुक, ओळखपत्र, वर्षभर विविध कार्यक्रमांची आणि स्पर्धांची मेजवानी सुद्धा. 

मुंबईचे असणारे अनिलकुमार यांचे खरे नाव आनंद शिंदे आहे. परंतु अनिलकुमार या नावानेच ते प्रसिद्ध आहेत. महाराष्टÑात अनेक ठिकाणी विविध शो त्यांनी केले आहेत. इतकंच नाही तर सांगायला विशेष वाटते की ‘बबल शो’ला जन्मच दिला आहे. विविध शो ते स्वत: तयार करतात. ऐश्वर्या रॉय, शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या घरी विविध कार्यक्रमांनिमित्त ‘बबल शो’ त्यांनी सादर केले आहेत.सोलापूरमध्ये पार पडलेल्या ‘बबल शो’ मधे बिग बबल, स्मोक बबल, ग्लास बबल, बबल अराऊंड चिल्ड्रन असे विविधानेक बबल्सचे सादरीकरण करुन अक्षरश: मुलांची मने जिंकली. सदस्यांनी भरपूर एन्जॉय करत ‘बबल शो’ ला डोक्यावरती घेतलं. पालकांनी तर लोकमतचे खूप आभार मानले. आपापल्या कामांमध्ये व्यस्त असणाºया पालकांना असे शो लोकमत बालविकास मंचमुळे मुलांना दाखवायला मिळतात याचा आनंद वाटला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कमांडन्ट सुपरिटेंडंट आॅफ पोलीस रामचंद्र केंडे, सविता केंडे, लुक अ‍ॅण्ड लाईक विपुल बंकापुरे, न्यू बॉम्बे बेकरीचे धनंजय हिरेमठ, समुपदेशक अलका काकडे, लोकमतचे सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचा सत्कार करून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेनंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कमांडन्ट सुपरिटेंडंट रामचंद्र केंडे यांनी मुलांना मार्गदर्शक करताना आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करीत असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी विविध खेळ, योगाभ्यास, सांस्कृतिक तसेच देशाभिमान वाढविण्यासाठी देश सेवेबद्दल विविध उपक्रमात आपला सहभाग नोंदवला पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुपदेशक अलका काकडे यांनी चिंटूच्या पात्रातून मुलांना गोष्टीच्या माध्यमातून मोबाईल आपल्यासाठी किती हानिकारक आहे आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला.


Web Title: The 'Bubble Show' max, childish tune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.